भाजीपाल्याची मातीमोल दराने विक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

अकोला बाजारात दर घसल्याने शेतकरी चिंतातूर 

अकोला - सध्या येथील बाजारात भाजीपाल्याचे दर कमालीचे घसरल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रविवार (ता. 11) च्या बाजारात सर्वच भाजीपाला चार ते दहा रुपये प्रतिकिलोदरम्यान विकला गेला. दरम्यान, सोमवारी बाजारपेठ बंद होती; परंतु काही माल विक्रीसाठी आला होता. त्यालाही अत्यल्प दर मिळाला. 

अकोला बाजारात बुलडाणा, वाशीम, अकोला, जालना आदी जिल्ह्यांमधून भाजीपाल्याची आवक होते. रविवारी आठवड्याचा बाजार भरतो. या बाजारात टोमॅटो 50 ते 80 रुपये क्रेट विकल्या गेल्या. शेतकऱ्यांना तीन ते चार रुपये किलोचा दर मिळाला. फ्लॉवर व कोबीचा दर पाच ते सहा रुपये किलो होता. पालक, मेथी, कोथिंबीर पाच ते आठ रुपये किलोने विकली गेली. वांग्यांना तर सर्वांत कमी म्हणजे तीन ते पाच रुपयांचा दर मिळाला. आजवरचा सर्वांत कमी दर वांग्यांना सध्या मिळत आहे. गाजराचीही स्थिती सहाशे ते हजार रुपये क्विंटलदरम्यान होत आहे. कांदा पाच ते सात रुपये किलोने विकला गेला. हिरव्या मिरचीचा दर 10 रुपयांपर्यंत होता. घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. 

रविवारी भाजीपाल्याला मिळालेले दर (किलो/रुपये) 
टोमॅटो---4 
कोबी---5 ते 6 
पालक---5 
गाजर---8 ते 12 
मेथी---5 ते 8 
कोथिंबीर---5 ते 10 
कांदा---5 ते 7 
वांगे---2 ते 5 

Web Title: Vegetable prices down to half