स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात

Strawberry
Strawberry

सातारा: जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मातृरोपास झालेला विलंब, लागवडीच्या काळात दमदार पावसाने लागवडीस झालेला खोळंबा आदी कारणामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झाली होती. परिणामी, स्ट्रॉबेरीच्या उत्पादन घट झाली. मात्र गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना यंदाचा हंगाम दिलासादायक ठरला. 

राज्यात महाबळेश्वर तालुक्‍यात पोषक हवामानामुळे स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. लागवडीसाठी परदेशातून मातृरोपे आणले जातात. ग्रीन हाउसमध्ये या मातृरोपांद्वारे लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती केली जाते. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मातृरोपे येतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून लागवडीस प्रारंभ होतो. मात्र यंदाच्या हंगामात शासनाच्या आयात-निर्यात धोरणामुळे मातृरोपे जूननंतर येण्यास प्रारंभ झाला. परिणामी, रोपे तयार होण्यास उशीर झाला. तसेच लागवडीच्या काळात महाबळेश्वर तालुक्‍यात परतीचा दमदार पाऊस सुरू असल्याने जमिनीत वाफसा उशारी आला. यामुळे साधारणपणे तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लागवड पुढे गेला होता. वरिल सर्व कारणांमुळे महाबळेश्वर तालुक्‍यात तीन हजार एकर क्षेत्रांवर होणारी लागवड दोन हजार एकर झाली. तर वाई, कोरेगाव, जावळी, सातारा तालुक्‍यात 1500 एकर होणारी लागवड अवघी 500 एकर क्षेत्रावर झाल्याने जिल्ह्यात सुमारे दोन हजार एकर क्षेत्राची घट झाली होती. 

या हंगामात दोन हजार 500 एकर क्षेत्रावर लागवड होती. क्षेत्रातील घटीमुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासून दर चांगले मिळण्यास सुरुवात झाली. एकूण उत्पादनापैकी 60 टक्के स्ट्रॉबेरीची विक्री वाशी मार्केटला, 25 टक्के विक्री व्यापारी, थेट विक्री, संस्थेच्या माध्यमातून होते. तसेच प्रक्रियेसाठी महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजापीला खरेदी- विक्री संस्था, सह्याद्री कृषक सेवा सोसायटी, श्रीराम फळे प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून 15 टक्के उत्पानाची खरेदी होते. 

सध्या महाबळेश्वर तालुक्‍यात स्ट्रॉबेरीचा हंगाम 90 टक्के संपला असून, पाच ते दहा टक्के शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धतता आहे अशा शेतकऱ्यांचा हंगाम सुरू राहणार आहे. हा पाच ते 10 टक्के हंगाम जूनपर्यंत चालेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्ट्रॉबेरी एकरी सरासरी उत्पादना खर्च हा चार लाखापर्यंत येत असतो. एकरातून स्ट्रॉबेरीचे 12 टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळत असते. खर्च वजा एकरी दीड लाख रुपये शिल्लक राहत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

हंगामास विलंब 
जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची मातृरोपे येण्यास सुमारे तीन आठवडे विलंब झाला होता. यामुळे सुमारे एक महिना लागवड पुढे गेली होती. यामुळे नोव्हेंबरमध्ये येणारी स्ट्रॉबेरी 20 डिसेंबर महिन्यात बाजारात आली. मागील वर्षी दिवाळीचा सण लवकर असल्याने दिवाळीत स्ट्रॉबेरी उपलब्ध झाली नाही. यामुळे दिवाळीस मिळणाऱ्या चांगला दरापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले होते. 

तुलनात्मक दराची स्थिती (प्रतिकिलो/रुपये) 
कालावधी---2015-16---2016-17 
डिसेंबर---125 ते 150---250 ते 300 
जानेवारी---70 ते 75---150 ते 200 
फेब्रुवारी--- 50 ते 60---75 ते 100 
मार्च---30 ते 40---60 ते 75 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com