नगर जिल्ह्यात १०० शिक्षक कोरोना बाधित

दौलत झावरे
Monday, 14 December 2020

जिल्ह्यात माध्यमिकच्या 1200 शाळा असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू आहेत.

नगर ः राज्य सरकारच्या निर्देशानुसार, शाळा सुरू झाल्या असल्या, तरी त्यास म्हणावा तितका प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही. जिल्ह्यात सध्या अवघ्या 558 शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थींची ऑफलाईन शिक्षण घेण्यात संख्या कमीच आहे.

सोळा हजार शिक्षकांपैकी चौदा हजार शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आलेली असून त्यात सुमारे 100 शिक्षक बाधीत आढळून आलेले आहेत.
जिल्ह्यातील 1200 शाळा आहेत.

हेही वाचा - आमदार बबनराव पाचपुते झाले कोरोनाबाधित

शासनाच्या आदेशानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात 1 लाख 84 हजार विद्यार्थी आहेत. राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे.

जिल्ह्यात माध्यमिकच्या 1200 शाळा असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू आहेत. एकूण 16 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 14 हजार शिक्षकांची चाचणी झाली आहे. त्यात आतापर्यंत 100 जणांचे अहवाल बाधित आले असून, अजून अनेक कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी आहेत.

जिल्ह्यात 558 शाळांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीद्वारे अध्यापन सुरू आहे. उर्वरित शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त होत आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 teachers in Nagar district affected by corona