नगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा चालला बारा हजाराकडे, आज साडेपाचशे

12,000 corona patients in Ahmednagar
12,000 corona patients in Ahmednagar

नगर ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा रोज वाढत आहे. आज (गुरुवारी) दिवसभरात एकूण 528 जण बाधित आढळले. जिल्ह्यात आजअखेरर्यंत 11 हजार 801 एवढा झाला आहे. सध्या 3208 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

समाधानाची बाब एवढी की बरे होऊन घरी परतणाऱ्यांची आकडेवारी लक्षणीय आहे. आज दिवसभरात एकूण आठ जणांचा कोरोनाने बळी घेतला. 

जिल्हा रुग्णालयाच्या टेस्ट लॅबमध्ये एकूण 76, अँटीजेन चाचणीत 202 व खासगी प्रयोगशाळेत 250 जण बाधीत आढळून आले. रुग्ण बरे होण्याचा टक्का 71.70 आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्टलॅबमध्ये महापालिका हद्दीत 34, नगर ग्रामीणमध्ये 24, कॅन्टोन्मेंटमध्ये दोन, नेवाशात दहा, पारनेरमध्ये तीन, शेवगावमध्ये एक, मिलिटरी हॉस्पिटलमध्ये एक व इतर जिल्हा रुग्णालयात एक अशा रुग्णांचा बाधितांमध्ये समावेश आहे. 

अँटीजनेचाचणीत संगमनेरमध्ये 24, राहात्यात 24, पाथर्डीत 19, नगर ग्रामीणमध्ये दोन, श्रीरामपूरमध्ये 14, नेवाशात 22, श्रीगोंद्यात 17, पानेरमध्ये आठ, अकोल्यात17, राहुरीत सहा, शेवगावमध्ये 26, कोपरगावमध्ये पाच, जामखेडमध्ये 13 व कर्जतमध्ये पाच रुग्णांचा समावेश आहे. 
खासगी प्रयोगशाळेत अहवालामध्ये महापालिका हद्दीत 207, संगमनेरमध्ये सहा, राहात्यात आठ, पाथर्डीत एक, कॅन्टोन्मेंटमध्ये एक, नेवाशात पाच, पारनेरमध्ये तीन, अकोल्यात चार, राहुरीत तीन,शेवगावमध्ये तीन, कोपरगावमध्ये एक रुग्णाचा समावेश आहे. 
रुग्ण बरे होण्याच्या आकड्याची 

साडेआठ हजाराकडे वाटचाल 
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्ण बरे होण्याची आकडेवारीही वाढत आहे. दिसवभरात 720 जण बरे होऊन घरी परतल्यामुळे जिल्ह्यातील बरे होणाऱ्यांची संख्या आजअखेरपर्यंत 8461 एव्हढी झाली आहे.

दिवसभरात महापालिका हद्दीतील 269, संगमनेरमधील 21, राहात्यातील 6, पाथर्डीतील 43. नगर ग्रामीणमधील 44, श्रीरामपूरमधील 19, कॅन्टोन्मेंटमधील 22, नेवाशातील 22, श्रीगोंद्यातील 30, पारनेरमधील 33, अकोल्यातील दोन, राहुरीतील आठ, शेवगावमधील 32, कोपरगावमधील 62, जामखेडमधील 17, कर्जतमधील 26, मिलिटरी हॉस्पिटलमधील चार व इतर जिल्ह्यातील एक रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com