Ahmednagar : जिल्ह्यातील १५ लाख मतदार आधार जोडणीविना

निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक करण्याचे आवाहन
15 lakh voters did not link voter id to aadhar card election commission ahmednagar
15 lakh voters did not link voter id to aadhar card election commission ahmednagarSakal

अहमदनगर : निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ३५ लाख ६७ हजार ८१७ मतदारांपैकी आतापर्यंत केवळ २० लाख ४५ हजार ४४६ (५७.३० टक्के) मतदारांनीच आपले आधार लिंक केले आहे. १५ लाख १२ हजार ३७१ मतदारांचे आधार जोडणी राहिलेली आहे.

मतदार यादीमध्ये काही त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. काही मतदारांची नावे यादीमध्ये दुबार नावे आहेत. मयत व्यक्तींची नावे कमी केलेली नाहीत. निवडणूक आयोगाकडून मतदार यादी परिपूर्ण आणि दोषरहित याकरिता प्रयत्न सुरू आहेत. मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम देखील या प्रयत्नांचाच भाग आहे. परंतु, तरीदेखील मतदार यादीमध्ये दुबार नावे असणे, व्यक्ती मृत होऊनही तिचे नाव दुबार यादीमध्ये असणे यासारखे प्रकार पुढे येत असतात.

प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक युनिक असल्याने हा क्रमांकच मतदार ओळखपत्राला लिंक केल्यास मतदारयादी अद्ययावत आणि दोष रहित होण्यास मदत होणार आहे. मतदारांनी आपल्या ओळखपत्राला आधार लिंक करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले असून, जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेच्या माध्यमातून हे काम सध्या सुरू आहे.

मतदारसंघनिहाय आकडेवारी (एकूण मतदार आधार लिंक कंसात)

अकोले- २ लाख ५५ हजार ६२२(१,५८,४३७), संगमनेर-२ लाख ७३ हजार ५९४ (२,०७,५०७), शिर्डी-२ लाख ७० हजार ९००, (१,५०,२१६), कोपरगाव- २ लाख ७० हजार ८०१, (१,४५,८२३), श्रीरामपूर-२ लाख ९७ हजार ४८० (१,७५,९५२), नेवासे-२ लाख ६८ हजार ९४४ (२,१६,९८६), शेवगाव-३ लाख ५५ हजार ७१२ (१,४७,७००),

राहुरी-३ लाख ५ हजार ४९७ (१,४९,५४०), पारनेर-३ लाख ३१ हजार ८५२ (१,९४,८३५), नगर शहर-२ लाख ८९ हजार ३२९ (१,२०,८३८), श्रीगोंदे-३ लाख १९ हजार ४८ (१,९६,८१०), कर्जत-जामखेड-३ लाख २९ हजार ३८ (१,८०,८४२) अशी जिल्ह्यात ३५ लाख ६७ हजार ८१७ मतदार आहेत. त्यापैकी २० लाख ४५ हजार ४४६ मतदारांनी आधार लिंक केले आहे. त्याचे प्रमाण ५७ टक्के आहे.

५७ टक्के आधार लिंक

मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी निवडणूक शाखेकडील अर्ज क्रमांक ६ ब भरून द्यावा लागतो. आतापर्यंत जिल्ह्यात ५७ टक्के मतदारांनी आधार लिंक करवून घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com