esakal | बाप रे ः नगरमध्ये कोरोनाचा हाहाकार... दिवसभरात तब्बल १६७ पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

167 corona positive in Nagar district

प्रशासनाकडूनही कोणताही जाब विचारला जात नाही. दिवसा कोणताही अटकाव नसतो. रात्री मात्र फिरण्यास मनाई आहे. हे नागरिक दिवसाच एकमेकांच्या संपर्कात येत आहेत.

बाप रे ः नगरमध्ये कोरोनाचा हाहाकार... दिवसभरात तब्बल १६७ पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार उडवला आहे.रोज वीस ते पन्नासच्या संख्येने सापडणारे रूग्ण आता शंभर आणि दीडशेच्या पटीत गेले आहेत. रूग्ण वाढत असतानाही भाजीबाजार, किराणा दुकाने, कापड दुकाने फुल्ल भरत आहेत.तेथे कोणतेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.

प्रशासनाकडूनही कोणताही जाब विचारला जात नाही. दिवसा कोणताही अटकाव नसतो. रात्री मात्र फिरण्यास मनाई आहे. हे नागरिक दिवसाच एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही जिल्ह्यात लॉकडाउन करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले.

या शिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३२२ इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ इतकी झाली आहे.

दरम्यान, आज ४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ७७३ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

आज सकाळी ३२ जणांचे अहवाल  बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील ११, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १६ आणि श्रीगोंदा तालुक्यातील ५ जणांचे अहवाल बाधित आढळून आले.

दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १७ जणांचे अहवाल बाधित आढळून आले. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील १० (पाथर्डी शहर ०८, कोल्हूबाई कोल्हार ०२), भिंगार येथील ०२, नगर तालुक्यातील ०१ (घोसपुरी) आणि राहुरी तालुक्यातील ०४ (राहुरी फॅक्टरी ०३, म्हैसगाव ०१) जणांचे अहवाल बाधित आढळून आले.

सायंकाळी ६५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले यामध्ये पारनेर ०४ (सिध्देश्वर वाडी ०३, खडक वाडी ०१) पाथर्डी ३२ (आगासखांड ०२, कोल्हुबाई कोल्हार ०९, तिसगाव ०३,  त्रिभुवनवाडी  ०४, खाटीक गल्ली पाथर्डी 14),  कोपरगाव ०८ (सूरेगाव), 

नेवासा ०१ (शिरसगाव),  नगर ग्रामीण १३ (नागापूर ०२, पोखर्डी ०८, देऊळगाव ०१, सांड सांडवा ०२), नगर शहर ०२,  जामखेड ०३ (दिघोळ ०२, लहाने वाडी ०१) आणि श्रीगोंदा ०१ (घोगरगाव), संगमनेर खुर्द ०१, अशा रुग्णांचा समावेश आहे.

उपचार सुरू असलेले रुग्ण:५१६
बरे झालेले रुग्ण: ७७३
मृत्यू: ३३
एकूण रुग्ण संख्या:१३२२

संपादन - अशोक निंबाळकर