कोपरगावातील धामोरी कॅमेऱ्याच्या निगराणीखाली, गावात का बसवले बरे कॅमेरे

कोपरगावातील धामोरी कॅमेऱ्याच्या निगराणीखाली, गावात का बसवले बरे कॅमेरे

पोहेगाव ः कोपरगाव तालुक्‍यातील धामोरी ग्रामपंचायतीने गावात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे पूर्ण गावावर आता ग्रामपंचायतीची निगराणी राहणार आहे. 
गावात मध्यंतरी काही समाजकंटकांनी सार्वजनिक स्वच्छतागृहात जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर लिहून गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ग्रामस्थांनी तो हाणून पाडला.

गावात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी संपूर्ण गावच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला व तो आमलातही आणला. 

संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणारी धामोरी ग्रामपंचायत तालुक्‍यातील पहिलीच असल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला आहे. धामोरी ग्रामपंचायतीने 14 वा वित्त आयोग व दहाव्या प्रशासकीय खर्चाअंतर्गत हा उपक्रम राबविला आहे.

गावातील मुख्य वेस, गावठाण मध्य रस्ता, बसस्थानक, जलशुद्धीकरण केंद्र, धोबी घाट, भैरवनाथ चौक परिसर, बॅंक परिसर, सार्वजनिक चौक, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, गावात प्रवेश करणारे सर्व मुख्य रस्ते, प्राथमिक शाळा व हायस्कूल परिसर तब्बल 18 कॅमेरे बसवले आहेत. त्यांचे नियंत्रण ग्रामपंचायतीकडे आहे. 

या उपक्रमाचे व्यावसायिक व ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. या उपक्रमाची पाहणी कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांनी करून ग्रामपंचायतीचे कौतुक केले. 

 धामोरी ही सीसीटीव्ही बसविणारी तालुक्‍यातील बहुदा पहिली ग्रामपंचायत ठरावी. या उपक्रमाचा फायदा नक्कीच पोलिस प्रशासनाला होईल. गावात होणाऱ्या छोट्या-मोठ्या चोऱ्यांस आळा बसेल. तसेच गावात घडणाऱ्या गुन्ह्यांचा शोधो घेण्यास या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताणही कमी होईल. 
-दौलतराव जाधव 
पोलिस निरीक्षक, कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com