कोरोना हात धुवून लागला नगरकरांमागे.. आज निघाले २४ बाधित

24 corona patients in Ahmednagar
24 corona patients in Ahmednagar

नगर ः नगर शहर कोरोनाच्या अधिन गेले आहे. दररोज किमान २५ ते ३० रूग्ण कोरोनाबाधित आढळून येत आहेत. पुढच्या पंधरवड्यात धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. सिद्धार्थनगर, नालेगाव, तोफखाना या भागात सर्वाधिक कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. तेथे कुटुंबच्या कुटुंब बाधित सापडत आहेत.

ही चिंतेची बाब आहे. सावेडी उपनगरातही कोरोनाने धुंमाकूळ सुरू केला आहे. त्यामुळे नवीन रूग्णांची धास्ती वाढत आहे.

जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३२, अकोले तालुका ०२, जामखेड, राहाता, संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

याचबरोबर आज येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. नगर शहरातील १४ यामध्ये सिद्धार्थनगर ०५, पद्मानगर ०३, नालेगाव ०२, दसरेनगर ०१, चितळे रोड ०१, अवसरकर मळा, सारसनगर ०१, कलानगर ०१, भिंगार ०२, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, संगमनेर), भातकुडगाव (शेवगाव) ०१, दाढ बु. (राहाता) ०१,  खेरडे (पाथर्डी) ०१, भोंदरे (पारनेर) ०१, केसापुर (राहुरी) ०१, कोळगाव (श्रीगोंदा) ०१

जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३६९ आहे. उपचार घेत असलेले रुग्ण १४९ आहेत. एकूण रुग्ण संख्या ५३३ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com