दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी २५ जादा एसटी बस

दौलत झावरे
Saturday, 31 October 2020

दरवर्षी अहमदनगर विभागातर्फे दीपावली सणानिमित्ताने जादा बसचे नियोजन केले जात आहे. एकाच दिवशी 100 जादा बस सोडल्या जात आहेत.

नगर ः दीपावली सणानिमित्ताने दरवर्षीच राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात नगर विभागातर्फे सुरवातीला 25 बसचे नियोजन केलेले आहे.

प्रवाशांच्या प्रतिसादानंतर त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 
दीपावली सणानिमित्ताने दरवर्षीच राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये जादा बस सोडण्याचे नियोजन केले जाते.

नियोजन यंदाही राज्यभर करण्यात आलेले असून अहमदनगर विभागाने सुरवातीच्या टप्प्यात फक्त 25 बसचे नियोजन केलेले आहे. त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर जादा बस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या जादा बस पुणे, मुंबई, कल्याण, नाशिक, बीड आदी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. या जादा बससाठी आरक्षणची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. 

दरवर्षी अहमदनगर विभागातर्फे दीपावली सणानिमित्ताने जादा बसचे नियोजन केले जात आहे. एकाच दिवशी 100 जादा बस सोडल्या जात आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रवाशांची होणारी गर्दी कमी लक्षात घेऊनच जादा बस कमी सोडण्यात आलेल्या असल्या तरी प्रवाशांची गर्दी वाढल्यानंतर तातडीने जादा बस सोडण्याची आखणी अहमदनगर विभागातर्फे करण्यात आलेली आहे. 

प्रवासांची एसटीकडून दिवाळी गोड 
दीपाळीच्या हंगामात दरवर्षीच एसटीकडून भाडेवाढ केली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी प्रशासनाने भाडेवाढ न करून प्रवाशांना दिलासा देऊन दीवाळी गोड केलेली आहे. 

दीपावली सणानिमित्ताने सुरवातीला 25 बसचे नियोजन केलेले आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आणखी जादा बसचे नियोजन करण्यात येणार असून प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा. 
-विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 ST extra bus for passengers for Diwali