29 crore 'Matruvandana' in the city
29 crore 'Matruvandana' in the city

नगरमध्ये 29 कोटींची "मातृवंदना' 

नगर ः बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी व मातांच्या सुरक्षेसाठी सरकारने सुरू केलेल्या मातृवंदना योजनेत जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषदेने प्रभावी अंमलबजावणी करताना, गेल्या अडीच वर्षांत 76 हजार 103 महिलांपर्यंत ही योजना पोचवली. मातांच्या खात्यावर तब्बल 29 कोटी 45 लाख 63 हजारांचे अनुदान जमा झाले. गरोदर मातांना सकस आहार मिळावा, यासाठी हे अनुदान दिले जाते. त्यामुळे या योजनेने जिल्ह्यात चांगलेच बाळसे धरले आहे. 

अनेक महिलांना गरोदरपणात, तसेच प्रसूतीनंतरही मजुरी करावी लागते. परिणामी, मातांसह बालमृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्याला आळा घालण्यासाठी 16 डिसेंबर 2017 पासून ही योजना सुरू करण्यात आली. पहिल्या अपत्यावेळी मातेस या योजनेंतर्गत लाभ दिला जातो. गरोदरपणा ते प्रसूती अशा तीन टप्प्यांत मातांना पाच हजारांचे अनुदान मिळते.

बालकांचे कुपोषण व मृत्यू रोखणे, तसेच मातांना सकस आहार मिळण्यासाठी हे अनुदान देण्यात येते. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या जनजागृतीचा परिणाम म्हणून मागील अडीच वर्षांत 76 हजार 103 मातांनी या योजनेचा लाभ घेतला. नोकरदार महिला वगळता, इतरांना योजनेचा लाभ मिळतो. मातृवंदना योजनेत संगमनेर, नेवासे, नगर तालुक्‍यांचे काम जिल्ह्यात आघाडीवर आहे. 

असे मिळते अनुदान 
गरोदर राहिल्यानंतर नोंदणीच्या वेळी मातांना एक हजार रुपये, सहाव्या महिन्यांत दोन हजार रुपये दिले जातात. त्यानंतर प्रसूतीनंतर बालकांची जन्मनोंद आणि तिसरा डोस पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान बॅंक अथवा टपाल खात्यात जमा केले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मातांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांनी केले आहे. 
 
तालुकानिहाय लाभार्थी (कंसात अनुदान) 
अकोले- 4811 (1,97,20,000) 
जामखेड- 2632 (1,11,39,000) 
कर्जत- 3769 (1,57,06,000) 
कोपरगाव- 5128 (2,12,19,000) 
नगर- 5472 (2,33,73,000) 
नेवासे- 5575 (2,40,54,000) 
पारनेर- 4408 (1,86,71,000) 
पाथर्डी- 4046 (1,79,33,000) 
राहाता- 5180 (2,18,29,000) 
राहुरी- 5278 (2,20,85,000) 
संगमनेर- 8349 (3,63,76,000) 
शेवगाव- 4549 (2,03,50,000) 
श्रीगोंदे- 4812 (2,07,77,000) 
श्रीरामपूर- 4479 (1,80,66000) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com