संगमनेरमध्ये नियमभंग; शहरातील तीन दुकाने ‘सील’

Shops Seal
Shops SealGoogle

संगमनेर (जि. नगर) : पुन्हा कोविड रुग्ण वाढत असल्याने काहीसे सैलावलेले प्रशासन पुन्हा अलर्ट झाले आहे. कोविडच्या अनुषंगाने शासनाने जारी केलेल्या नियमांचा भंग केल्याने आज सायंकाळी शहरातील मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या हॉटेलसह तीन दुकाने ‘सील’ करण्यात आली.

प्रशासनानेही नियमांच्या अधीन राहून सकाळी सात ते सायंकाळी चारदरम्यान दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना सायंकाळी चारनंतर फक्त पार्सल सेवेला परवानगी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील दुकानदारांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवण्यास सुरवात केली.

सायंकाळी चारनंतरही शिक्षणशास्त्र महाविद्यालाजवळ सुरू असलेला भाजीपाला बाजार व पेठेतील दुकानदारांना दवंडीद्वारे तंबी देण्याची वेळ आली होती. अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई करूनही फारसा उपयोग झाला नाही. आज सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील एक स्वीट्स व तीन बत्ती चौक परिसरातील लजीज हॉटेल या दुकानांत ग्राहकांची गर्दी आढळली. नायब तहसीलदार तथा प्रभारी तहसीलदार उमाकांत कडनोर, तलाठी पोमल तोरणे, भीमराज काकड, लिपिक किरण राऊत व कोतवाल रवी थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Shops Seal
कांदाबाजार पुन्हा दोनशे रुपयांनी रिव्हर्स
Shops Seal
नगर तालुक्यात दक्षता पथकांची ३४ गावांत कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com