अहमदनगर : ४०० झाडांची कत्तल

पिंपळगाव माळवी येथील ७०० एकर जागेत घडला प्रकार; संबंधित व्यक्तींच्या विरोधात देणार पोलिस ठाण्यात फिर्याद
400 trees cut down
400 trees cut downSakal

अहमदनगर - महापालिकेच्या जागेवरील तब्बल ४०० झाडांची अज्ञात व्यक्तींनी कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या पिंपळगाव माळवी येथील जागेत हा प्रकार घडला. या प्रकरणी संबंधित व्यक्तींच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

पिंपळगाव माळवी येथे महापालिकेच्या मालकीची ७०० एकर जागा आहे. घनदाट झाडे असलेल्या या जागेकडे महापालिकेचे काही वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. त्याचाच गैरफायदा घेत परिसरातील काही अज्ञात व्यक्तींनी येथील वृक्षांची कत्तल करण्याचा उद्योग सुरू केला. लिंब, चिंच, बाभूळ, चंदन, जांभूळ अशा अनेक प्रकारची झाडे या जागेत आहेत. काही लहान तर काही मोठी झाडे तोडण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी काही कर्मचाऱ्यांना सोबत घेत मंगळवारी अचानक तेथील झाडांची पाहणी केली. तेव्हा या जागेवरील सुमारे ४०० झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. नजान यांनी वरिष्ठांना याबाबत कळवले. उपायुक्त यशवंत डांगे यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तींच्या विरोधात पोलिसांकडे फिर्याद देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com