४०० वर्षापूर्वीचा ‘हा’ ऐतिहासिक तलाव भरला पहिल्यांच

दत्ता इंगळे
Tuesday, 18 August 2020

चारशे वर्षापुर्वी ऐतीहासिक काळात तयार झालेला भातोडी तलाव 1992 नंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. सध्या तलावात14 दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे.

नगर : चारशे वर्षापुर्वी ऐतीहासिक काळात तयार झालेला भातोडी तलाव 1992 नंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग आनंदीत झाला आहे. सध्या तलावात14 दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे.
 

वर्षानुवर्ष साठठलेल्या गाळामुळे 37 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या तलावात आज अखेर 14.90दशलश घमफूट पाणी साठा झाला आहे. 120 हेक्‍टर सिंचन क्षेत्र असलेल्या या तलावाच्या सांडव्यातून पडलेले पाणी मेहेकरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. भातोडी तलाव पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे भातोडी, पारगाव, पारेवाडी, चिचोंडी पाटील, आठवड, सांडवे, मांडवे, दशमीगव्हाण या गावातील शेतकरी वर्गास फायदा होणार आहे.
पुर्वी या तलावातून वरील गावतील शेतकऱ्यांना पाटाद्वारे सेतीला पाणी पुरवले जायचे. मात्र मध्यंतरी तलाव पुर्ण क्षमतेने भरत लसल्याने शेतकऱ्यांना पावसावरील पाण्यावरच समाधान मानावे लागत होते.
 

शेतकरी वर्गाची गाळ काढण्याची मागणी
भातोडी तलाव चारशे वर्षापुर्वीचा असल्याने या तलावात प्रचंड गाळ साचला असल्याने याची साठवण क्षमता कमी झाली आहे. सासनाच्या वतीने या तलावाचा गाळ काढण्यात यावा नगर तालुक्‍यात सर्वाधीक साठवण क्षमता असलेल्या ऐतीहासीक तलावाचा गाळ काढल्यास परिसरातील गावच्या शेतकऱ्यांचा विकास होईल, असे श्‍याम घोलप म्हणाले.
 

तलाव क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इसारा
नगर तालुक्‍यातील भतोडी तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने पाणी मेहेकरी नदीपात्रात साडण्यात आले असून नदी पात्रा लगतच्या भातोडी, पारेवाडी, चिचोंडी पाटील, आठवड या गावांना व वाड्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 400 year old historical lake in Nagar taluka has been filled for the first time