लेक धावली माहेरच्या मदतीला, दिले ४५ अॉक्सीजन सिलेंडर

जामखेड तालुक्यातील कोविड सेंटरसाठी मदतीचा हात
45 oxygen cylinders to help Jamkhed taluka
45 oxygen cylinders to help Jamkhed talukagoogle

जामखेड : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दररोज काळजाचा ठोका चुकविणाऱ्या बातम्या कानावर पडत आहेत. बेड, रेमडेसिव्हिर व ऑक्‍सिजन सिलिंडरची कमतरता कोविड सेंटरचालकांसाठी आडचणीचे ठरत आहे. अशा संकटाच्या वेळी गावची लेक मदतीला धावली अन्‌ 45 ऑक्‍सिजन सिलिंडर जामखेडकरांना उपलब्ध करून दिले.

येथील जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मनसुखलाल कोठारी व शांताबाई कोठारी यांची मुलगी व नगर येथील ऍड. सुमतीलाल बलदोटा यांच्या धर्मपत्नी सुशीला यांनी ही मदत जामखेडकरांना दिली.

त्यांच्या विवाहाला 36 वर्षे झाली. मात्र सुशिला यांची माहेरची "वाट आणि नाळ' अजून आतूट आहे. जामखेड येथील रवी आरोळे व डॉ. शोभा आरोळे यांच्या पुढाकाराने "शासन-संस्था आणि लोकसहभागातून विनामूल्य सुरू असलेल्या कोविड सेंटरला ऑक्‍सिजन सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून माहेरच्या माणसांसाठी 45 ऑक्‍सिजन सिलिंडर प्रकल्प व्यवस्थापनाकडे सूपूर्द केली.

सुशीला यांचे बंधू संजय कोठारी, माजी सरपंच सुनील कोठारी हे बंधू नेहमी सामाजिक कार्यात पुढे असतात. या दोघांनीही कोविड सेंटरला भरीव मदत केलीली आहे.

बातमीदार - वसंत सानप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com