esakal | नगर जिल्ह्यात ३६ गावांतील पाण्याचे ४५ नमुने दूषित
sakal

बोलून बातमी शोधा

 water samples contaminated

नगर जिल्ह्यात ३६ गावांतील पाण्याचे ४५ नमुने दूषित

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नगर : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील पाण्याचे १७३१ नमुने जुलै महिन्यात तपासण्यात आले. त्यांत ३६ गावांतील ४५ नमुने दूषित आढळून आले आहेत. जामखेड, कर्जत, नेवासे, श्रीगोंदे, श्रीरामपूर या पाच तालुक्यांमध्ये एकही नमुना दूषित आढळून आला नाही. (45 water samples from 36 villages found contaminated In Nagar district)

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणीनमुने तपासले जातात. ज्या गावांतील पाणी दूषित आढळल, त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाणीनमुन्यांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या १७३१ पाणी नमुन्यांपैकी ४५ नमुने दूषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी २.६० वर गेली आहे. पाथर्डी व राहुरी तालुक्यांतील प्रत्येकी सात नमुने दूषित आढळले.

हेही वाचा: उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती - शंकरराव गडाख

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे

नगर : नारायणडोहो, कामरगाव, नागरदेवळे, देहरे, नांदगाव, सजलपूर.

अकोले : खिरविरे, देवठाण.

कोपरगाव : संवत्सर, कोळपेवाडी.

पारनेर : हत्तलखिंडी, वडुले, रायतळे, अस्तगाव, जवळा, सांगवी सूर्या.

पाथर्डी : खांडगाव, खिरडे, आल्हनवाडी, पाडळी, चितळी, जवळे, जिरेवाडी.

राहाता : सुलतानपूर खुर्द, आव्हाने बुद्रुक, आखेगाव, शेकटे खुर्द, विजापूर.

राहाता : अस्तगाव

राहुरी : शिलेगाव, तांदूळवाडी, अमळनेर, चांदेगाव, जातप.

संगमनेर : राजापूर, वडगाव पान.

हेही वाचा: वधूसह नातेवाइकांना पोलिसी पाहुणचार! चौघांना अटक

loading image