esakal | पिक विम्यासाठी ठाकरे सरकारकडून ४९६.१४ कोटीचा पहिला हप्ता मंजुर
sakal

बोलून बातमी शोधा

496 crore sanctioned by Chief Minister Thackeray for crop insurance

दिवाळीच्या तोंडावर राज्यात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना भेट दिली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने ४९६.१४ टक्के रक्कम वितरीत करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

पिक विम्यासाठी ठाकरे सरकारकडून ४९६.१४ कोटीचा पहिला हप्ता मंजुर

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर: दिवाळीच्या तोंडावर राज्यात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना भेट दिली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने ४९६.१४ टक्के रक्कम वितरीत करण्यासाठी मंजुरी दिली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी व कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस, केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचा विचार करून पिक विमा हप्ता अनुदानासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. 

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीमधून हा निधी दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या पीक विमा योजनेबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शकतत्वानुसार हा खर्च करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा २९ जून व 17 जुलै २०२० च्या निर्णयानुसार भारतीय कृषी विमा जनरल इन्शुरन्स कंपनी लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि., इन्शुरन्स कंपनी व एचडीएफसी इन्शुरन्स कंपनी यांच्याकडून राबवण्यात येत आहे. 

भारतीय कृषी विमा कंपनी विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० अंतर्गत उपरोक्त सहा कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदान राज्य सरकारकडे मागणी केली होती. मार्गदर्शक सुचनामधील तरतुदीनुसार या वर्षीची आकडेवारी उपलब्ध नसली तरी केंद्र व राज्य सरकारच्या हिस्सा अग्रीम स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.

या अनुदानाच्या रकमेत गेल्या हंगामाच्या सादर केलेल्या एकूण राज्य वित्त अनुदानाच्या 80 टक्केच्या 50 टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात कंपन्यांनी द्यावी असे म्हटले आहे. त्यानुसार 496.14 कोटी वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.