नगरमधील आजचा कोरोनाचा आकडा ऐकून येईल भोवळ

750 corona patients in Ahmednagar today
750 corona patients in Ahmednagar today

नगर: कोरोनाने आरोग्य यंत्रणेचे कंबरडे मोडले आहे. बघता बघता पाचाचे पन्नास झाले आणि आजचा आकडा तर झोप उडविणारा आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्या मोठा प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे.  

आज जिल्ह्यात एकुण ७५७ रूग्ण आढळून आले. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ४८, अँटीजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ रूग्ण बाधीत आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना टेस्ट लॅब आणि अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ४५ हजार १७२ तपासण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वावरताना आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, आज ७५७ बाधीत आढळून आल्याने आता उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २९७६ इतकी झाली आहे तर जिल्ह्यात आज ३८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४९६५ इतकी झाली असून रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ६१.७५ एवढी आहे.

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३८ रुग्ण बाधित आढळून आले बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीगोंदा ०१, श्रीरामपुर १७, राहुरी ०२,  मनपा ०५, कॅन्टोन्मेंट ०५, पारनेर ०५, नेवासा ०१, कोपरगाव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर आणखी १० जण बाधित आढळून आले.

यामध्ये नगर शहर ०४, नगर ग्रामीण ०१ - आलमगीर भिंगार, श्रीगोंदा  ०१ - बेलवंडी, कर्जत ०२- राशीन ०२, जामखेड ०१ - कोर्ट गल्ली, जामखेड, पाथर्डी ०१- जवखेडे, असे रूग्ण आढळून आले.

अँटीजेन चाचणीत आज ४०२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३६, संगमनेर १८,  राहाता ६२, पाथर्डी ४०, नगर ग्रामीण २८, श्रीरामपुर १५,  कॅन्टोन्मेंट १०, नेवासा १७,  श्रीगोंदा २७, पारनेर २०, अकोले ०१, राहुरी ०३,  शेवगाव ३०,  कोपरगाव ६१, जामखेड १७ आणि कर्जत १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३०७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २६४, संगमनेर ०९, राहाता ०४, पाथर्डी ०३,  नगर ग्रामीण ०४, श्रीरामपूर ०७, नेवासा ०४, श्रीगोंदा ०२, पारनेर ०४, अकोले ०२, राहुरी ०२, शेवगाव ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १८९, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी २५, नगर ग्रा.२४, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २४, श्रीगोंदा २, पारनेर ८, अकोले २, शेवगाव २, कोपरगाव ३, कर्जत १९.

बरे झालेले एकूण रुग्ण :४९६५

उपचार सुरू असलेले रूग्ण:२९७६

मृत्यू: ९४

एकूण रूग्ण संख्या: ८०३५

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com