अकोल्यात बहरल्यात ३०० सेंद्रिय परसबागा, आठशेचे उद्दिष्ट

 Akole Garden
Akole Garden

अकोले : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत अकोले तालुक्यात बचतगटांच्या माध्यमातून तीनशे परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे. आणखी पाचशे बागा तयार करण्याचे काम सुरू आहे.

अकोले पंचायत समितीच्या माध्यमातून ‘माझी उपजीविका समृद्धी मोहीम व माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ १५ जून ते १५ जुलैदरम्यान राबविण्यात येत आहे.

तालुक्यात बचतगटांच्या सहभागाने विविध ठिकाणी सेंद्रिय पद्धतीच्या परसबागा तयार करून प्रत्येक कुटुंबाला विषमुक्त पालेभाज्या व फळभाज्या उपलब्ध करून देण्याचा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या परसबागांत लागवड करण्यासाठी गावरान वांगी, पालक, मेथी, भेंडी, टोमॅटो, कोथिंबीर, गवार, कारली, घेवडा, वाल, शेपू, मिरची, अळू, राजगिरा, उडीद, नाचणी, फुलझाडे, कोरफड, पुदिना यांसह फुलझाडांचे विविध वाण देण्यात आले. (800 organic gardens in Akola)

 Akole Garden
हटके ः एकरात कमावतो १५ लाख, फक्त फोन घ्यायला चार कर्मचारी!

तालुक्यात किमान आठशे परसबागा तयार करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी तीनशेपेक्षा जास्त परसबागा तयार झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन केलेल्या स्वयंसाहाय्यता बचतगटांतील महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही मोहीम राबविण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एस. सोनकुसळे, तालुका व्यवस्थापक सोमनाथ गुंजाळ, कुंदन कोरडे, प्रभाग समन्वयक कुलदीप पाटील, दिगंबर म्हस्के, अमर कोळी, पल्लवी कोंडार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

अकोले तालुक्याच्या भूमिपुत्र बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी देशी वाणाचे जतन केले. नैसर्गिक व विषमुक्त शेती करण्याचा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे प्रत्येकाने घरासमोर विषमुक्त परसबाग निर्माण करावी.

- सोमनाथ गुंजाळ, तालुका व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

(800 organic gardens in Akola)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com