माहीजळगावात पानटपरीवरील छाप्यात ८८ हजारांचा गुटखा जप्त

नीलेश दिवटे
Thursday, 24 December 2020

या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील खैरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यात अवैद्य धंद्याविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने आशा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

कर्जत - येथील पोलिसांनी तालुक्यातील माहिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटरमध्ये छापा टाकून अठयाऐंशी हजार एक्कावन्न रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटखाविक्रेता लक्ष्मण झुंबर भिसे (वय ३४ रा महिजळगाव ता. कर्जत) यास रंगेहात ताब्यात घेऊन अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील खैरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यात अवैद्य धंद्याविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने आशा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा - पोपटराव पवारांचे गाव पाहिलं असेल आता त्यांची शेती पहा

तालुक्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे बंदी असलेल्या गुटख्याची विक्री चालू आहे.तालुक्यातील महिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर येथे सदर बंदी असलेल्या गुटख्याची विक्री चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री यादव यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाने जात गुरुकृपा पान सेंटरवरती छापा टाकीत पान टपरी आणि घरी असा मिळून आठयाऐंशी हजार एक्कावन्न रुपयांचा गुटखा जप्त केला.

सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, उपनिरीक्षक अमरजित मोरे व भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, गोवर्धन कदम, अमित बरडे, सुनील खैरे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रल्हाद लोखंडे करीत आहेत. 
 

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. तालुक्यातील सर्व गैरप्रकार व अवैद्य धंद्याचा बिमोड करू. असा काही प्रकार आढळल्यास तात्काळ पोलीस स्थानकात फोन करा. गुन्ह्याची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. मात्र, कारवाईपूर्वी सत्यता तपासली जाईल. गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे

- चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक,कर्जत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 88,000 gutkha seized in raid on Pantpari in Mahijalgaon