अहमदनगर जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनिया अन् हिवतापाचे ९१ रुग्ण

dengue, malaria, chikungunya
dengue, malaria, chikungunyaGoogle


अहमदनगर : जिल्ह्यात जानेवारी ते २४ सप्टेंबरपर्यंत डेंगी, चिकुनगुन्या अन् हिवतापाचे फक्त ९१ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये डेंगीच्या ६९, चिकनगुनिया २१ व हिवतापाच्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यात डेंगीचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी सध्या औषधफवारणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागात ३६ व महापालिका हद्दीत ३३ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात चिकनगुनियाचे २० आणि महापालिका हद्दीत हिवतापाचा एक व ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला आहे.

dengue, malaria, chikungunya
शेतकऱ्यांनो, सोयाबीन विक्रीची घाई करू नका! व्यापाऱ्यांचे आवाहन


जिल्ह्यात जानेवारी ते जुलैदरम्यान १२ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये ग्रामीण भागात सात व महापालिका हद्दीत पाच रुग्ण आढळले. ऑगस्ट ते आजअखेर जिल्ह्यात ५७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील आकडा चिंताजनक आहे. चिकनगुनियाचा आकडा जानेवारी ते मार्चदरम्यान कमी-जास्त होता. त्यात मे व जून महिन्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. जुलैमध्ये सर्वाधिक नऊ रुग्ण आढळले. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. हिवतापाचा जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान फक्त एक रुग्ण ऑगस्ट महिन्यात आढळून आला.

डेंगी रुग्णांची वर्षनिहाय संख्या
२०१६ ः २२३
२०१७ ः ७८
२०१८ ः १४५
२०१९ ः ३५९
२०२० ः ४९
सप्टेंबर २०२१ ः ६९

dengue, malaria, chikungunya
जरा थांबा, कांदा हसविणार आहे; शेतकऱ्यांना जाणकारांचे आवाहन



चिकनगुनिया रुग्णांची वर्षनिहाय आकडेवारी
२०१६ ः २३
२०१७ ः सात
२०१८ ः २५
२०१९ ः नऊ
२०२० ः ३१
सप्टेंबर २०२१ ः २१

हिवताप रुग्णांची वर्षनिहाय आकडेवारी
२०१६ ः २३
२०१७ ः १३
२०१८ ः ११
२०१९ ः दोन
२०२० ः चार
सप्टेंबर २०२१ ः एक

dengue, malaria, chikungunya
गिरणा धरण ७० टक्के भरले! पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com