राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस

राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस
Summary

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी होऊन, म्हणणे सादर करण्यासाठी राज्यमंत्री तनपुरे, मुख्य सचिव व महापालिका आयुक्‍तांना न्यायालयाने नोटिसा काढल्या आहेत.

अहमदनगर : महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता कल्याण बल्लाळ यांना पदावनत करण्याचे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून उपअभियंता बल्लाळ यांची पदोन्नती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनी कायम ठेवली होती. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी होऊन, म्हणणे सादर करण्यासाठी राज्यमंत्री तनपुरे, मुख्य सचिव व महापालिका आयुक्‍तांना न्यायालयाने नोटिसा काढल्या आहेत. (a bench notice has been issued to the municipal commissioner along with minister of state prajakt tanpure)

राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस
सदाभाऊ खोत अण्णांच्या भेटीला, सरकारलाच कोरोना झाल्याची टीका

शहरात नगरपालिका अस्तित्वात असताना कल्याण बल्लाळ यांना १९९५ मध्ये सबओव्हरसिअर या पदावर नियुक्‍ती देण्यात आली होती. सन २००० मध्ये कनिष्ठ अभियंता हे पद भटक्‍या जमातीसाठी (एनटी) सरळ सेवेने भरतीसाठी राखीव असताना, त्या पदावर कल्याण बल्लाळ यांना नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली. त्यानंतरच्या काळात मनपाने बल्लाळ यांना उपअभियंता पदावर पदोन्नतीदेखील दिली. याविरोधात शेख यांनी शासनाच्या नगरविकास विभागाकडे सन २०११ पासून पाठपुरावा करीत, नियमबाह्यपणे पदोन्नती झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस
नगरमध्ये रेशनचा काळाबाजार; धान्यसाठ्यांवर छापे

सन २०२० मध्ये शासनाने त्याची दखल घेऊन, बल्लाळ यांच्या पदोन्नतीबाबत नियुक्त प्राधिकारी या नात्याने महापालिका आयुक्त यांनी एक महिन्यात निर्णय घ्यावा व त्याप्रमाणे बल्लाळ यांना पदोन्नती देण्यात झालेल्या अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्याविरोधात नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश २८ फेब्रुवारी २०२० रोजी काढले. तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कार्यवाही न करता वेळकाढूपणा केला. त्याबाबत शेख यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार करून, ही बाब निदर्शनास आणून दिली.

राज्यमंत्री तनपुरे यांच्यासह महापालिका आयुक्तांना खंडपीठाची नोटीस
40 वर्षांच्या अविरत मेहनतीनंतर भाजप सत्तास्थानी; अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची खडतर वाटचाल

त्यावरून शासनाने १० नोव्हेंबर २०२० रोजी मनपा आयुक्तांना बल्लाळ यांची शाखा अभियंता या पदाच्या पदोन्नती साखळीतील सबओव्हरसिअर या पदाच्या समकक्ष पदावर पदावनती करण्याचा निर्णय घेण्याचे आदेश दिले. मात्र, ही कार्यवाही रद्द करण्याबाबत बल्लाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी बल्लाळ यांच्या पदावनतीबाबतच्या कार्यवाहीस स्थगिती दिली होती. शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी १६ जुलैला होणार आहे. शेख यांच्या वतीने ॲड. आविष्कार शेळके यांनी बाजू मांडली. (a bench notice has been issued to the municipal commissioner along with minister of state prajakt tanpure)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com