
प्रदिर्घ चाललेल्या पावसाळ्यानंतर आता नगर तालुक्यातील लाल (नाशिक) कांदा काढणीस तसेच उन्हाळी (गावरान) कांदा लागवडीस वेग आला आहे.
अहमदनगर : प्रदिर्घ चाललेल्या पावसाळ्यानंतर आता नगर तालुक्यातील लाल (नाशिक) कांदा काढणीस तसेच उन्हाळी (गावरान) कांदा लागवडीस वेग आला आहे. सततच्या पावसाने लागवड केलेला लाला कांदा बऱ्याच प्रमाणात खराब झाला.
काही शेतकऱ्यांचा लागवड केलेला कांदा रोपे अतिपावसाने वाहुन गेली. उर्वरित कांदा रोपांवर लागवड केलेला लाल कांदा काढणीस आला असून सध्या नगर तालुक्यात या कांदा काढण्याची लगबग चालु आहे.
उन्हाळी कांदा रोपे लागवडीच्यिा वेळेस ही अवकाळी पावसाने फटका दिल्याने अनेकांचे गावरान कांदारोप वाहुन गेले होते. काहींनी पुन्हा नव्याने बी आणून रोपांची लागवड केली तर काहींनी दामदुप्पट पैसे देत गावरान कांद्याचे रोप विकत घेतले आहे.गेल्या महिनाभरापासून पावसाने पुर्णता उघडीप दिल्याने शेताची मशागत करून गावरान कांद्याची लागवड सुरू केली आहे. मात्र काही भागात भारनियमन असल्याने कडक थंडीत आगदी पहाटेपासूनच कांदा लागवडीच्या कामास सुरवात करावी लागते.
कांदा लागवडी साठी मजूरांचेही रोटेशन
तालुक्यात भारनियमन असल्याने ज्या भागात विज उपल्बध आहे, त्या भागात मजूरांना भल्या पहाटे किंवा रात्री उशीरा पर्यंत कांदा लागवड करावी लागते. त्यामुळे एका शेतकऱ्याकडे तीन दिवस कांदा लागवड केली, की मदत करणाऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात पुढील तीन दिवस कांदा लागवड केली जाते.
पुन्हा पुढचे तीन दिवस पहिल्या शेतकऱ्याकडे लागवड करायला येतात. कांदा लागवड करताना मजूरी पेक्षा एकमेकांना रोटेशन पध्दतीने मदत करत कांदा लागवड करण्यावर सध्या भर दिला जात आहे.
संपादन : अशोक मुरुमकर