लॉकडाउनमुळे लॉकअपमध्ये ः सात वर्षांपूर्वी अत्याचार करून पळाला होता

Accused in lockup due to lockdown
Accused in lockup due to lockdown

नगर : घारगाव (ता. संगमनेर) परिसरात महिलेवर बलात्कार करून पसार झालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात वर्षांनंतर आज गजाआड केले. पांडुरंग यशवंत शेंगाळ (वय 52, रा. शेंगाळवाडी, संगमनेर), असे त्याचे नाव आहे. 

रगाव परिसरात सात वर्षांपूर्वी महिलेवर बलात्कार करून आरोपी शेंगाळ पसार झाला होता. लॉकडाउनमुळे तो त्याच्या घरी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेंगाळवाडी डोंगरात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या नावाबाबत खात्री करून तपासाकामी त्यास घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रेय हिंगडे, अण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव होत असतानाही नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध व्यवसायावर उगारलेले हत्यार खाली ठेवले नाही. दररोज एक का होईना कारवाई त्यांच्याकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com