esakal | अल्पवयीन मुलीवर अत्याचारातील आरोपीला चार वर्षांनी अटक
sakal

बोलून बातमी शोधा

अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचारातील आरोपीला चार वर्षांनी अटक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेला आरोपी अंकुश बर्डे याला चार वर्षांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. अंकुशच्या विरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

अंकुश बर्डे (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) याने ता. १२ एप्रिल २०१८ रोजी इतर साथीदारांच्या मदतीने राहुरी तालुक्‍यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस पळविले होते. तिच्यावर अत्याचार केला होता. या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश आणि त्याच्या साथीदारांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा दाखल झाल्यास फरार होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फरार आरोपींचा शोध मोहिम हाती घेतली. त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले. तो राहुरी बसस्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याला या पथकाने जाऊन अटक केली. त्याला पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांकडे वर्ग केले आहे.

हेही वाचा: राज्यसरकारला सद्बुद्धी दे! राधाकृष्ण विखेंचे भगवतीला साकडे

loading image
go to top