कोणती नोटीस नाही की सूचना; आलं मनाला की, पाडलं घर

Action on encroachment near Parner taluka
Action on encroachment near Parner taluka

पारनेर (अहमदनगर) : ग्रामसभेला परवानगी नसतानाही जवळ्यात ग्रामस्थांच्या दबावाला बळी पडत एक दिवस आगोदर थेट गावभर भोंगा लाऊन ग्रामस्थांची बैठक बोलावली. या बैठकित अतिक्रमणे काढण्याचा विषय झाला. मात्र ठराविक लोकांचीच अतिक्रमणे काढल्याने आता हा कळीचा मुद्दा झाला आहे.

प्रशासक म्हणतात मला ग्रामस्थांची बैठक झाल्याचे माहीत नाही, मी उपस्थीत नव्हतो तर ग्रामसेवकही म्हणतात आम्ही ग्रामसभा बोलावलीच नाही. लोकांनी निर्णय घेतला व त्यांनीच अतिक्रमणे काढली आहेत. ग्रामपंचायतीचा अतिक्रमणे काढण्याशी काहीच संबध नाही. मात्र यात गोरगरीबांची अतिक्रमणे निघाली व धनदांडग्यांनी तशीच राहील्याने याबाबत वाद सुरू झाला आहे.

जवळा येथे गावाशेजारी वेशीच्या बाहेर गायराण जमिन असलेल्या या सरकारी जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. ही जागा गावाच्या आगदी मोक्याच्या ठिकाणी असल्याने अनेकांनी या जागेवर अतिक्रण केले आहे. ही जागा राष्ट्रीय महामार्गा लगत असल्याने या जागेला सोन्याचा भाव आला आहे. ही जागा स्वमालकीची समजून अनेकांनी येथे कच्ची व पक्की घरे, गाळे बांधून अतिक्रमण केले आहे. यात काही गरजू व हतावर पोट असणारी तर काही धनदांडगी मंडळी आहेत. धनदांडग्यांनी अतिक्रमण करून त्या जागा गरजूंना भाडेपट्याने दिल्या आहेत.

अनेकांनी सरकारी जागेवर अतिक्रमणे करून परस्पर त्याची विक्रीही सुरू केली आहे. याचा परिणाम काही ग्रामस्थांना हे न पटल्याने तीन दिवसापुर्वी (ता. 28 ) ग्रामस्थांची बैठक घेऊन ही अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ती काढण्यास सुरूवातही केली यात गरीबांची अतिक्रमणे काढली. धनदांडग्यांची तशीच ठेवली असा वाद अता निर्माण झाला आहे. काहिनी तर कोरोना काळात ग्रामसभेला परवाणगी नसताना ती घेतलीच कशी असा प्रश्न अता उपस्थीत केला आहे.

मी लोकांना समजाऊन सांगीतले होते लोकांनी ऐकले नाही. अचानक अतिक्रमणे काढता येत नाही आपण नोटीसा देऊ व मग अतिक्रमणे काढू, असे ग्रामस्थांना सांगीतले. मात्र असे खूप दिवसापासून सुरू आहे असे म्हणत लोकांनीच पुढाकार घेऊन अतिक्रमणे काढली, असे ग्रामविस्तार अधिकारी एस. बी. खामकर यांनी सांगितले. 
मला या बाबत काहीच माहिती नाही. ग्रामस्थांच्या बैठकिस नव्हतो. तसेच अतिक्रण काढताना सुद्धा तेथे उपस्थीत नव्हतो, त्यामुळे याबाबत मला काहीच सांगता येणार नाही, असे प्रशासक पी. जी. पळसे यांनी सांगितले.

आम्हाला कोणतीही पुर्व कल्पना न देता आमचे पत्र्याचे शेड पाडून टाकले आहे. माझा संसार व मुले उघड्यावर पडली आहेत. अशा प्रकारे अचानक अतिक्रमणे काढण्याची ही कारवाई कोणी व कोणाच्या परवानगीने केली याबाबत मला माहिती मिळावी. मला न्याय मिळावा, असे मागणी करणारे निवेदन शिला बाबाजी वागदरे यांनी तहसीलदार यांना दिले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com