मुंबईचा वानोळा नगरमध्ये...जिल्ह्यात आणखी सहा कोरोना बाधितांची भर

Addition of six more corona victims in the district
Addition of six more corona victims in the district

नगर ः जिल्ह्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. आज तब्बल सहा कोरोना बाधितांची आणखी भर पडली. जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या पाच व्यक्ती, याशिवाय घाटकोपर येथून लिंगदेव (अकोले) येथे आलेल्या एका व्यक्तीचा खासगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयाने त्याची पुन्हा येथे चाचणी केली असता, तो बाधित असल्याचे आढळून आला आहे. त्यामळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 89 वर पोचला आहे. 


जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या पाच व्यक्तींचे जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत. याशिवाय दोन रुग्णांचे रिपीट अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 
पारनेर तालुक्‍यातील म्हसने फाटा येथील 31 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्‍यातील वडाळा महादेव येथील 33 वर्षीय पुरुष, अकोले तालुक्‍यातील ढोकरी येथील 35 वर्षीय पुरुष, नगर तालुक्‍यातील वाकोडी येथील 43 वर्षीय पुरुष आणि निंबळक येथील तीस वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. मात्र, या व्यक्ती मुंबईहून आपल्या जिल्ह्यात आल्या होत्या, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. याशिवाय सुभेदार गल्ली येथील कोरोना बाधित व्यक्तीचा दहा दिवसानंतरचा स्त्राव चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com