ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंटचा अवलंब करा : थोरात 

Adopt tracing, testing, treatment: Thorat
Adopt tracing, testing, treatment: Thorat

संगमनेर : ""प्रशासनाने दिलेल्या सूचना समजावून सांगा. नागरिकांना नियम पाळण्यास भाग पाडा. कोरोना या जागतिक महामारीविरुद्धचे युद्ध अद्यापही संपलेले नाही. प्रशासनाने दिलेली शिथिलता ही मोकळीक नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे. प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा अवलंब करा,'' अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. 

हेही वाचा या सालगड्याचा मुलगा असा झाला मंत्री... आता देह झाला चंदनाचा 

कारखाना कार्यस्थळावर कोरोना उपाययोजनांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, डॉ. हर्शल तांबे, डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलिस निरीक्षक अभय परमार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचेरिया उपस्थित होते. 
थोरात म्हणाले, ""मागील तीन महिन्यांत लॉकडाउनमुळे कोरोनाचा प्रसार वाढ रोखण्यात यश आले आहे. 75 दिवसांनंतर राज्यात "मिशन बिगीन' अंतर्गत लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांनीही पूर्णपणे मोकळीक नसल्याचे लक्षात घ्यावे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसून, तो काही भागात संक्रमणातून वाढू पाहत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या नियमांच्या पालनाबरोबरच, प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याची सवय लावावी.'' 

आवश्‍य वाचा बोगस बियाण्याबाबत खासदार लोखंडे म्हणतात... 

संगमनेरमध्ये तपासण्या वाढविण्यात आल्या असून, "थ्री टी' फॉर्म्युल्यानुसार ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. 
आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रशासनाच्या उत्तम कामाचे कौतुक करताना, नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले, तर प्रांताधिकारी मंगरुळे यांनी कोरोनाबाबत प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. 
......  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com