
अहिल्यानगर : पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने शहरासह शेवगाव येथे विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पथकाने शहरात बागडपट्टी येथे जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १९ लाख ८० हजार, तर शेवगाव येथे मावा सेंटर कारवाई करत सुमारे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शेवगाव येथील कुंटणखान्यावर कारवाई करत १७ महिलांची सुटका करण्यात आली आहे. या छापेमारीत आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.