अहमदनगर : कृषी योजना राबविण्यात जिल्हा अव्वल

दोन वर्षांत १४२ कोटींचे अनुदान कांदाचाळीच्या अनुदानात वाढ
agricultural schemes be received
agricultural schemes be receivedsakal

अहमदनगर : जिल्ह्याचे क्षेत्र मोठे आहे. गेल्या तीन-चार वर्षांत वाढलेल्या पर्जन्यमानामुळे बागायती क्षेत्र वाढत आहे. वहिती क्षेत्रात वाढ होत आहे. विविध योजनांची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होते. त्याची अंमलबजावणीही जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून, तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून चांगली होत आहे. त्यामुळे विविध योजना राबविण्यात जिल्हा विभागात अव्वल ठरला आहे.

पावसाचे प्रमाण वाढत गेल्याने खरिपाचे क्षेत्र विशेष वाढले आहे. २०२१-२२ मध्ये ६ लाख २३ हजार हेक्टर इतके हे क्षेत्र झाले आहे. पूर्वी मुख्य पीक कापूस, बाजरी हे खरिपात होत होते. त्यात आता सोयाबीन, मका या पिकांची भर पडली आहे. तसेच तूर, मूग अशा कडधान्याचे क्षेत्रही २ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. कांद्याचे क्षेत्र वाढून २ लाख हेक्टरवर गेले आहे.

जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे १४२ कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून झाले. मागील दोन वर्षांत १६६४ कांदाचाळी झाल्या आहेत. आता कांदाचाळींच्या अनुदानातही मोठी वाढ करण्यात आली आहे. कांदाचाळ, अस्तरीकरण, पॉलिहाऊस, यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन अशा विविध योजनांखाली अनुदानाचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. महाडीबीटीचा ५३ हजार ८८१ शेतकऱ्यांना १४२कोटी ७० लाखांचे अनुदानवाटप करण्यात आले आहे. ठिबक सिंचनाचे २७ हजार ४७२ लाभार्थी होते. त्यासाठी ५८ कोटी १७ लाख अनुदान वाटप करण्यात आली.कांदा चाळीसाठीही १४ कोटींचे अनुदान दोन वर्षात देण्यात आले आहे.

पर्जन्यमान(मिलीमीटरमध्ये)

सरासरी ४६६

२०१७ - ३४१

२०१८ - ३४१

२०१९ - ४०९

२०२० - ७६१

२०२१ - ५६६

आकडे बोलतात

(आकडे हेक्टरमध्ये)

१७ लाख - जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र

१३ लाख ६० हजार -

लागवडीलायक क्षेत्र

११ लाख ८५ हजार- कृषी खातेदार

४ लाख ४८ हजार- खरिपाचे क्षेत्र

७ लाख २६ हजार- रब्बीचे क्षेत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com