Ahmednagar : एक लाखांची तीन गावठी पिस्तुले जप्त

बीड येथील तरुणाला अटक करण्यात आली
जप्त गावठी पिस्तूल.
जप्त गावठी पिस्तूल.sakal

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक लाख १३ हजार ७०० रुपये किमतीची तीन गावठी पिस्तुले जप्त केली. याप्रकरणी बीड येथील तरुणाला अटक करण्यात आली. चांदणी चौक परिसरात आरटीओ कार्यालयाच्या गेटजवळ ही कारवाई करण्यात आली.

सुयोग ऊर्फ छोट्या मच्छिंद्र असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुले व १२ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती चांदणी चौक परिसरात आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गावठी पिस्तुले विक्री करण्यासाठी येणार आहे, ही माहिती मिळताच कटके यांनी कारवाईसाठी पथक पाठविले. 

या पथकाने त्या परिसरात जाऊन सापळा लावला असता, एक तरुणाला संशयास्पद फिरताना आढळून आला. पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली असता, त्यात गावठी पिस्तुल आढळले. त्याच्या पॅन्टच्या खिशात १२ जीवंत काडतुसे आढळून आली.

या पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com