"...अन्यथा शासन दरबारी तक्रार केली जाईल," संग्राम जगताप संतापले

महापालिका अधिकारी फैलावर
sangram jagtap
sangram jagtapsakal media

अहमदनगर : शहरातील विविध कामांची पाहणी करताना ठिकठिकाणी झालेल्या दुरवस्थेबाबत आमदार संग्राम जगताप महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांवर संतापले. दिवाळीच्या तोंडावर शहरात कचऱ्याचे ढीग, खांबांवर अनधिकृत फलक, धुळीचे साम्राज्य आदींबाबतीत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच अधिकारी नुसतेच ठेकेदारांच्या बैठका घेण्यात व्यग्र आहेत. लोकांच्या प्रश्नांचे त्यांना देणे-घेणे नाही, अशी टीका त्यांनी केली.

शहरात आज अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या वेळी जगताप म्हणाले, की आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे व सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या ए. सी. केबीनमध्ये बसून फायलींवर सह्या करण्यात व्यस्त आहेत; परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. सर्वत्र अनधिकृत पार्किंग, अस्वच्छता, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, विद्युत पोलवर जाहिरातींचे अनधिकृत फलक, शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असताना ही मनपाचे अधिकारी व कर्मचारी कुठल्याही प्रकारचे चांगले काम करत नाही. नगर शहरातील जनतेसाठी कुठलेही चांगले काम करताना दिसत नाही. यापुढील काळात जो अधिकारी कामचुकारपणा करेन, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना आमदार जगताप यांनी आयुक्तांना दिला.

अहमदनगर शहर स्वच्छ, सुंदर, हरित राहण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे; परंतु अधिकारी फक्त आपल्या एसी केबीनमध्ये बसून फायलींवर सह्या करण्यातच व्यग्र आहेत. ठेकेदारांच्या बैठका करण्यात देखील व्यस्त आहे; परंतु सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ नाही, असा आरोप जगताप यांनी केला. यापुढील काळात नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावा, अन्यथा शासन दरबारी तक्रार केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. या वेळी प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे,अभिजित खोसे, संतोष ढाकणे तसेच आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com