Crime News : बाडगव्हाण येथे मक्याच्या शेतात गांजाची झाडे; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marijuana addiction

Crime News : बाडगव्हाण येथे मक्याच्या शेतात गांजाची झाडे; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बाडगव्हाण येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका शेतातून अडीच लाख रुपये किमतीची गांजाची ३३५ लहान-मोठी हिरवी झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी एका शेतकऱ्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात बुधवार ता १० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी बाडगव्हाण येथिल अशोक सुदाम काजळे (वय ४६) या शेतकऱ्याने शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या माहितीची खात्री करून मंगळवार ता.९ रोजी (गट क्र ५२/१/१) मक्याच्या शेतात छापा टाकला असता ५०किलो १०० ग्रॅम वजनाची एकूण ३३५ गांजाची झाडे मिळून आली.

सध्याच्या बाजारभावानुसार या गांजाची अडीच लाख पाचशे रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.आरोपी विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात एनडिपीसी. सन १९८५ चे कलम २०(ब) अधिनियमांप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. (Latest Marathi News)

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशान्वये शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहायक फौजदार विष्णू घोडेचोर, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, महिला पोलीस नाईक भाग्यश्री भिटे, चालक पोलीस नाईक बबन बेरड, गुप्त वार्ता विभागाचे बाप्पासाहेब धाकतोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी करत आहे. (Breaking Marathi News)

टॅग्स :AhmednagarCrime News