Ahmednagar : जिल्हा बॅंकेला ४२ कोटींचा नफा

वार्षिक सर्वसाधारण सभा ; साडेनऊ टक्के लाभांषाची घोषणा
ahmednagar
ahmednagarsakal

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ४२ कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला आहे. बॅंकेच्या ठेवी आठ हजार ३६५ कोटी रुपयांवर गेल्या असून, साडेनऊ टक्के लाभांष देण्यात येणार असल्याची घोषणा बॅंकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांनी केली.

बॅंकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (शनिवारी) येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आॅनलाईन पद्धतीने झाली. अध्यक्षस्थानी ॲड. शेळके होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आॅनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

सभेस उपाध्यक्ष माधवराव कानवडे, ज्येष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी आमदार राहुल जगताप, ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, अंबादास पिसाळ, अरुण तनपुरे, करण ससाणे, गणपतराव सांगळे, आशा तापकीर, अनुराधा नागवडे, अशोक पवार, सतीश राजेभोसले तसेच मान्यवर उपस्थित होते.

ahmednagar
कृषी विद्यापीठाची कमान नव्या अधिकाऱ्यांवर

ॲड. शेळके म्हणाले, की बॅंकेचे मागचे दोन वर्ष अत्यंत खडतर गेले. कोरोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना बॅंकेने शेतकऱ्यांना हात देण्याचा प्रयत्न केला. बॅंक ही जिल्ह्यातील सार्वजनिक विकासाची महत्त्वाचा भाग आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कायमच बॅंकेने प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या काळात अनेक अडथळे आले असताना बॅंकेने शेतकऱ्यांना आधार दिला. अडचणीच्याकाळात बॅंकेने भांडवल, निधी, ठेवी, खेळते भांडवल व नफ्यातही वाढ केली.

या वेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी आभार मानले. दरम्यान, महसूलमंत्री थोरात यांनी ई-पिक आॅनलाईन पद्धतीने केल्याने शेतकऱ्यांच्या वतीने बॅंकेने त्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com