Ahmednagar : शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग व्यवस्थेत त्रुटी

कमी दृश्यमानतेमुळे विमान उड्डाणे रद्द
SHIRDI
SHIRDISAKAL

शिर्डी : शिर्डी विमानतळावर नव्याने तयार केलेल्या नाईट लँडिंग व्यवस्थेत त्रुटी आढळल्या. त्यामुळे येथून कमी दृश्यमानतेत विमान उड्डाणे सुरू ठेवण्याचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. आता साईमंदिर दर्शनासाठी खुले झाले, तरी हे विमानतळ रात्रीच्या उड्डाणासाठी सज्ज नसेल. एवढेच नाही तर दृश्यमानता कमी झाली की येथील विमानसेवा बंद ठेवावी लागेल. ‘देव लागला द्यायला अन्‌ पदर नाही घ्यायला,’ अशी या विमानतळाची अवस्था झाली आहे.

साईमंदिर सुरू होताच एअर इंडिया, स्पाईस जेट व इंडिगो या तिनही कंपन्या येथील विमान फेऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी उत्सुक आहेत. गो एअर कंपनीनेही प्रस्ताव दिला आहे. मुंबई विमानतळाचे पार्किंग म्हणून हे विमानतळ महत्त्वा भूमिका बजावू शकते. उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक सोयीचे असे त्याचे भौगोलीक स्थान आहे. उत्पन्न वाढीच्या या सर्व बाबी केवळ नाईट लँडिंग अभावी तीन वर्षांपासून रखडल्या.

अनुभव व क्षमता नसलेल्या ठेकेदारांमुळे नगर-कोपरगाव रस्ता खड्ड्यात गेला. विमानतळ उभारणीचा अनुभव नसलेल्या महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणामुळे या विमानतळाची प्रगती रखडली. कुठलाही अनुभव नसताना, शिर्डी विमानतळाची उभारणी करण्याचा हा प्रयोग चांगलाच अंगाशी आला. विमानतळ सुरू झाले त्यादिवशी पुढील सहा महिन्यांत नाईट लँडिंग व्यवस्था सुरू करण्याची घोषणा झाली. अडीच वर्षात ती प्रत्यक्षात आली नाही. हिवाळ्यात या विमानतळाभोवतीची दृश्यमानता धुक्यामुळे कमी होते. त्यामुळे केवळ नाईट लँडिंग यंत्रणा नसल्याने हे विमानतळ सलग दीड महिना दिवसा बंद ठेवावे लागले.

या कालावधित येथील विमाने औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आली. प्रवाशांना खड्ड्यातील रस्त्याने मोटारीने औरंगादेहून येथे येण्याचा भुर्दंड सोसावा लागला. साई मंदिर सुरळीत सुरू होते. त्याकाळात येथून सतरा विमाने ये-जा करीत होती. नाईट लँडिंग यंत्रणा कार्यान्वित असती, तर येथून चाळीस विमानांची उड्डाणे सुरू झाली असती.

SHIRDI
संगमनेर : अज्ञात व्यक्तीने जाळली भाजप नेत्याची लाखोंची वाहने

देशभरातील प्रमुख महानगरे एव्हाना या विमान तळासोबत जोडली असती. मात्र, नाईट लँडिंग व्यवस्थेचे घोडे अडीच वर्षांपासून पेंड खात आहे. सध्या वर्षभरापासून हे विमानतळ बंद आहे. या कालावधित नाईट लँडिंग व्यवस्थेची उभारणी केली. मात्र, भारतीय विमान प्राधिकरणाच्या पथकाने त्यात त्रुटी काढल्या. त्या दूर करायला आणखी काही कालावधी लागू शकेल. याक्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन या त्रुटी तातडीने दूर करणे शक्य आहे. मात्र महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या कामकाजाचा आजवरचा वेग लक्षात घेता हे काम किती दिवसांत पूर्ण होईल, हे सांगता येत नाही.

शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुविधा सुरू होईल. याबाबत कुठलीही अडचण नाही. हे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

- दीपक कपूर

कार्यकारी संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण

विमानतळ उभारणीसाठी आपण सातत्याने त्या-त्या काळातील मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभेतही हा विषय सातत्याने मांडला. नाईट लँडिंग व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्यासाठी आपण केंद्र किंवा राज्य सरकारकडे पाठपुरावा करायला तयार आहोत. ही सुविधा लवकरात सुरू होणे गरजेचे आहे.

- राधाकृष्ण विखे पाटील, आमदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com