अहमदनगर : होलेवाडीत मुसळधार पाऊस

पावसाने राशीनसह परिसराला एक तास झोडपून काढले
Heavy rains
Heavy rains esakal

राशीन : कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील होलेवाडी परिसरात आज (रविवारी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतीचे बांध व छोटे पूल वाहून गेले. ओढे ओसंडून वाहिले. शेतशिवारात पाणीच पाणी झाले. दरम्यान वीज पडून दादा पांडुरंग शिंदे यांची एक मेंढी दगावली.

पावसाने राशीनसह परिसराला एक तास झोडपून काढले. कित्येक दिवसांनी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला. जून महिना सुरू होऊनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. होलेवाडी, चिलवडी परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने करून तातडीने करून मदत व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम पाटील यांनी केली आहे.पर्जन्यमानाची आकडेवारी उद्या मिळेल. तसेच सॅटेलाईटची आकडेवारीही सकाळी समजेल, असे तहसीलदार नानासाहेब आगळे, यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com