अहमदनगर : मॉन्सूनपूर्व पावसाची जिल्ह्यात हजेरी | Maharashtra Monsoon Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Monsoon Updates

अहमदनगर : मॉन्सूनपूर्व पावसाची जिल्ह्यात हजेरी

अहमदनगर : जिल्ह्याच्या काही भागात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजासह नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी सायंकाळी नगर, श्रीगोंदे, पाथर्डी, राहुरी, शेवगाव, राहाता तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मॉन्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. (Maharashtra Monsoon Updates)

यंदा मॉन्सून पूर्वी अवकाळी पावसानेही पाठ फिरविली होती. त्यामुळे चिंतेत भर पडली होती. परंतु मागील आठवडा भर पावसाने तुरळक ठिकाणी हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. नगर तालुक्यातील जेऊर येथे पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे नाले पाण्याने वाहत होते. या पावसाने आता शेती मशागतीच्या कामांना वेग येणार असून पावसाचा जोर कायम टिकून राहिल्यास मुग, उडीद, वटाणा, सोयाबीन पिकांच्या पेरणीस लवकरच सुरुवात होऊ शकते. नगर, पाथर्डी, जामखेड, शेवगाव तालुक्यात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस श्रीरामपूर तालुक्यात झाला. नगर शहरातही पावसाने हजेरी लावली.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये

नगर : २०.५, पारनेर : १.५, श्रीगोंदे : ५.५, कर्जत : १.५, जामखेड : १६.८, शेवगाव : ३०.०, पाथर्डी : ७.८, संगमनेर : १.१, अकोले : २.३, कोपरगाव : ५.६, श्रीरामपूर ; ०.६, राहाता : ९.६

Web Title: Ahmednagar Pre Monsoon Rains District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top