Samruddhi Highway: लांबी 80 किमी,खर्च 3200 कोटी; समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्यामुळे या भागाचा होणार फायदा

या दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये असून, लांबी 80 किलोमीटर आहे. या टप्याच्या उद्‍घाटनानंतर नियोजित एकूण 701 किलोमीटर पैकी आता 600 किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होईल.
Eknath Shinde
Eknath Shinde Esakal

शिर्डी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज होत आहे.

Eknath Shinde
NH 4 झाला आता "श्रीलंका रोड' : नवा नंबर- AH 47

दुसऱ्या टप्प्यामुळे नाशिक-मुंबई-पुणे हा विकासाचा सुवर्ण त्रिकोण उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील १० जिल्ह्यांशी थेट व १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष जोडला जाईल. तसेच शिर्डीच्या विकासाचे नवे दालन खुले होईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली. ते म्हणाले, की समृद्धी महामार्गावरील सर्वांत मोठ्या सिन्नर इंटरचेंजमुळे शिर्डी, अहमदनगर, नाशिक व पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल.

Eknath Shinde
Pune : कचरा प्रश्न, वाहतूक कोंडी, वाघोलीत ड्रेनेज तुंबून रस्त्यावर पाणी, दोनशे इंडस्ट्रीजला फटका

या दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये असून, लांबी 80 किलोमीटर आहे. या टप्याच्या उद्‍घाटनानंतर नियोजित एकूण 701 किलोमीटर पैकी आता 600 किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होईल. सिन्नर येथील गोंदे इंटरचेंज येथून नाशिक, अहमदनगर, पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल.

Eknath Shinde
Mumbai Trans Harbour Link : असा असेल मुंबईचा नवा सागरी सेतू

भरवीर इंटरचेंजपासून घोटी (ता. इगतपुरी) अंदाजे 17 किलोमीटर अंतरावर आहे. या इंटरचेंजपासून नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल. शिर्डी, अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबईचे अंतर कमी वेळात पार करता येईल. या कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजपचे आजी-माजी खासदार, आमदार, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com