Ahmednagar : श्रीरामपुरातील नेते रथ ओढण्यासाठी एकत्र

सर्वच पक्षांतील प्रमुख राजकीय नेते व पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सर्वांशीच हस्तांदोलन करत संवाद साधला.
माजी आमदार भानुदास मुरकुटे
माजी आमदार भानुदास मुरकुटेsakal

श्रीरामपूर : श्रीरामनवमी यात्रा उत्सवानिमित्त प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची आज (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वच पक्षांतील प्रमुख राजकीय नेते व पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सर्वांशीच हस्तांदोलन करत संवाद साधला.

श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची फुलांनी सजविलेल्या रथामधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, यात्रा समितीचे अध्यक्ष राम टेकावडे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, भाजपचे प्रकाश चित्ते,

माजी आमदार भानुदास मुरकुटे
Pune Police कर्मचाऱ्याची भन्नाट शक्कल, कुत्र्याला हेल्मेट घालून पुणेकरांना शिकवली अक्कल

बाळासाहेब ओझा, सचिन गुजर, संजय फंड, आशिष धनवटे, राहुल मुथा, सिद्धार्थ मुरकुटे, अशोक उपाध्ये, मनसेचे बाबा शिंदे, अशोक बागूल, जयंत चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शंतनू फोफसे, विराज आंबेकर, प्रवीण फरगडे, महेंद्र पटारे, बंडू शिंदे, डॉ. दिलीप शिरसाठ, संजय छल्लारे, रवी पाटील, अशोक कानडे, राजेंद्र देवकर, सुधीर वायखिंडे, राजेंद्र सोनवणे, तिलक डुंगरवाल यांच्यासह यात्रा कमिटी व राममंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार भानुदास मुरकुटे
Pune Metro : मेट्रोच्या कामामुळे शहरात आजपासून वाहतुकीत बदल

यानंतर रथयात्रा वाद्यांच्या गजरात मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत शिवाजी रस्ता व पुढे महात्मा गांधी चौकातून पुन्हा राम मंदिराजवळ आली. यावेळी रथावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. मिरवणुकीत श्रीरामपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी

रथमिरवणुकीत तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. डीजेच्या तालावर ‘जय श्रीराम’चा जयघोष करत तरुणाई थिरकली. शहरातील बेलापूर रस्त्यावर कालव्याशेजारी यात्रा समितीच्या वतीने फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com