अहमदनगर : स्वतंत्र पाणीयोजना कार्यान्वित करा ;काकडे

शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे.
शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे.
शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. sakal

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. तेथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत असून, सोनविहीर येथे पाणीपुरवठ्याची स्वतंत्र सोय करा, असे निवेदन शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना ॲड. शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी दिले.

शेवगाव तालुक्यातील मौजे सोनविहीर या गावाचा हातगावसह २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे. मात्र, ही योजना मागील १५ वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे. मध्यंतरी मुंगी येथून रुर्बन योजेनेखाली पाणीपुरवठा करण्याचे ठरले होते. परंतु पाईपची दरवाढ झाल्याने ठेकेदाराने काम केले नाही. त्यामुळे सोनविहीरला पाणी मिळू शकले नाही. महिलांना पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागते. ग्रामस्थांना हातगावसह २८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत राहायचे नसल्याबाबतचा ठरावदेखील ग्रामपंचायतीने दिलेला आहे. त्यामुळे सोनविहीरचा बोधेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करावा.

गावासाठी स्वतंत्र पाण्याची सोय करावी, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून हंडा मोर्चा काढतील, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर आबासाहेब काकडे, रामकिसन विखे, काशिनाथ डोंगरे, अंकुश गर्जे, श्रीराम विखे, मनोहर विखे, निर्मला काकडे, कल्पना काकडे, द्वारका पहिलवान, शशिकला अवचित्ते, रफिया शेख, कडूबाई विखे, मंडण अवचित्ते, लंका विखे, सुमित्रा शिंदे, अनिता विखे, आशा विखे, लता विखे, रहीबाई विखे महिला व इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com