Ahmednagar अहमदनगर : चव्हाण, धस, बंब, लंके यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashwantrao Chavan state level Adarsh Lok Pratinidhi Award

अहमदनगर : चव्हाण, धस, बंब, लंके यांना पुरस्कार

पारनेर : सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात येणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सुरेश धस, आमदार प्रशांत बंब आणि आमदार नीलेश लंके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पुरस्काराचे वितरण विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हस्ते तर पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हिवरे बाजार येथे शुक्रवारी (ता.२२) होणार आहे, अशी माहिती संरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली.

सरपंचासह गावांचे विविध प्रश्न मांडून विविध मागण्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पारनेरचे आमदार नीलेश लंके, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सुरेश धस, आमदार प्रशांत बंब यांना सरंपच परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले.

तीन प्रशासकिय अधिकाऱ्यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अंमलबजावणी संचलनालय मुंबईचे सहआयुक्त उज्ज्वल चव्हाण, कृषी विभाग पुणेचे रफिक नाईकवाडी यांना ‘उत्तम प्रशासक पुरस्कार’ देण्यात येणार आहेत.

या वेळी राज्यातील १० आदर्श सरपंच, पाच आदर्श ग्रामपंचायत, पाच आदर्श ग्रामसेवक तसेच पाच समाजसेवा पुरस्कार देण्यात येणार आहेत, असे प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: Ahmednagar Yashwantrao Chavan State Level Adarsh Lok Pratinidhi Award To Pruthviraj Chavan Suresh Dhas Prashant Bamb Nilesh Lanke

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top