Ahmednagar : ‘मिशन आपुलकी’तून ९ कोटी रुपयांचा निधी

उद्योजक, कंपन्यांनीही सेस फंड शाळांसाठी वळवला आहे
‘मिशन आपुलकी
‘मिशन आपुलकीsakal

अहमदनगर : सरकारी निधीची वाट न पाहता गावच्या शाळेसाठी माजी विद्यार्थी, भूमिपुत्र सरसावले आहेत. उद्योजक, कंपन्यांनीही सेस फंड शाळांसाठी वळवला आहे. अवघ्या सात महिन्यांत ८ कोटी ८० लाख १० हजार ५१४ रुपयांचा निधी जमा झाला आहे. यातून १ हजार ७३१ शाळांना लाभ झाला आहे. निधी देण्यात पारनेरकर आघाडीवर आहेत, तर सर्वांत कमी निधी श्रीरामपूरमधून मिळाला.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भूमिपुत्र, माजी विद्यार्थ्यांना आपल्या गावातील शाळेसोबत कनेक्ट करण्यासाठी मिशन आपुलकी हा उपक्रम सुरू केला आहे. १ मे पासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. कोपरगाव आणि राहुरीतील सर्वाधिक शाळांना या उपक्रमाचा लाभ झाला.

श्रीरामपूरचा आकडा सर्वात कमी (१४ शाळा) आहे. लोकांनी रंगकाम, प्रिंटर, संगणकापासून वर्गखोल्या बांधून देण्यापर्यंत हातभार लावला आहे, असे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले. नगर तालुक्यात १६२, पारनेरमध्ये ५५, राहाता ११२, नेवासे १९९, शेवगाव १०७, पाथर्डी ७१, संगमनेर १४३, अकोले ५८, जामखेड १७७, कोपरगाव २२०, कर्जत ११५, श्रीरामपूर १४, श्रीगोंदे ५१, राहुरी २४७ अशा एकूण १ हजार ७३१ शाळांना लाभ झाला आहे.

क्षुधेलिया अन्न द्यावे

क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ।। धर्म आहे वर्मा अंगी । कळले पाहिजे प्रसंगीं ।। सर्वां भूतीं द्यावे अन्न । द्रव्य पात्र विचारोन ।। पवित्र तें अन्न । हरिचिंतनी भोजन ।।

जे भुकेले असतील, त्यांना अन्नदान केले पाहिजे. द्रव्यदानही केले पाहिजे. हाच धर्म आहे. याच अर्थाचा हा अभंग आहे. हाच उद्देश वरील उपक्रमाचा आहे.

काय आहे उपक्रम?

जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आणि धनाचा आपल्या शाळेसाठी उपयोग व्हावा. त्यानिमित्ताने त्यांच्यासह पालक, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, कंपन्या शाळेसोबत जोडले जातील. त्यातून आर्थिक तसेच इतरही अडचणींची सोडवणूक होईल. या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

काय मिळाले?

एलईडी ४२, संगणक संच ३२, प्रिंटर संख्या २१, इन्व्हर्टर संच २१, वर्गखोल्या १०, साउंड सिस्टिम संच ३०. रंगकामापासून शालेय साहित्यापर्यंत देणगी स्वरूपात वस्तू मिळाल्या आहेत. माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती, पालक, उद्योजक, स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. पारनेरमध्ये ९ व शेवगावात १ वर्गखोली बांधून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com