esakal | ऐश्‍वर्याने भंडारदऱ्याच्या जंगलात काढलेल्या फोटोची पुरस्कारासाठी निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Aishwarya photo taken in Bhandardara forest selected for the award

भंडारदऱ्याच्या जंगलातलं काजव्यांनी उजळून निघालेलं झाड. ऐश्वर्या श्रीधर हिने काढलेला या फोटोची वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्करांत अत्यंत शिफारसीय फोटो म्हणून निवड झाली आहे.

ऐश्‍वर्याने भंडारदऱ्याच्या जंगलात काढलेल्या फोटोची पुरस्कारासाठी निवड

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : भंडारदऱ्याच्या जंगलातलं काजव्यांनी उजळून निघालेलं झाड. ऐश्वर्या श्रीधर हिने काढलेला या फोटोची वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्करांत अत्यंत शिफारसीय फोटो म्हणून निवड झाली आहे. 

या स्पर्धेच्या सीनियर गटात असा बहुमान मिळालेली ऐश्वर्या ही पहिली भारतीय महिला आणि सर्वात तरुण फोटोग्राफरही ठरली आहे. खारघरला राहणाऱ्या ऐश्वर्यानं चौदाव्या वर्षी पुरस्कारही मिळवला.

ऐश्वर्यानं गेल्या वर्षी भंडारदऱ्यला ट्रेकला गेलेली असताना हा फोटो काढला होता. मला हे झाड वरपासून खालपर्यंत प्रकाशानं उजळून निघालेलं दिसलं. मी त्याचे काही फोटो काढले, पण ते इतके सुंदर दिसत नव्हते. मी वर पाहिलं, तर आकाश ताऱ्यांनी भरलेलं होतं. मला वाटलं, आकाशही फ्रेममध्ये का घेऊ नये, असं ती सांगत आहे.
एरवी आकाशतल्या ताऱ्यांचं मार्गक्रमण दाखवण्यासाठी स्टार ट्रेल तंत्राचा वापर करून फोटो काढले जातात. ऐश्वर्यानं तेच तंत्र या फोटोत वापरलं आहे. 

काजव्यांचं चमकणं तिला का आकर्षित करतं, याविषयी ऐश्वर्या सांगते, एखादा छोटासा कीडा अंधारलेलं सगळं जंगल असं उजळवू शकतो, हे विलक्षण आहे. काजवे मला हॅरी पॉटर किंवा नार्नियामधल्या जादुई दुनियेची आठवण करून देतात. पावसाळ्याआधी, विणीच्या हंगामात काजवे आपल्या जोडीदाराला आकर्षित करुन घेण्यासाठी लयबद्ध चमकत राहतात.

हे अनोखं दृष्य पाहण्यासाठी आजकाल या काळात लोक जंगलात जाऊ लागले आहेत. पण काजव्यांचं निरीक्षण करताना खूप काळजी घ्यायला हवी असं ऐश्वर्या सांगते. लोकांनी काजवे जरूर पाहण्यासाठी जावं, पण त्यांच्यावर टॉर्च, मोबाईल, कॅमेऱ्याचा फ्लॅश मारू नये. नाहीतर त्यांच्या चमकण्याच्या आणि पर्यायानं विणीच्या प्रक्रीयेत बाधा येते, असं ती म्हणत होते. 

संपादन : अशोक मुरुमकर