"त्या' चिमुकलीच्या मृत्यूनंतर आईचा आक्रोश; आमदारांना आली जाग 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 July 2020

कुमारी अन्यना विश्वास शिंदे हिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही आत्मदहन करू, अशी भूमिका आई- वडिलांनी घेतल्याने व आमदार वेळ देत नसल्याने आम्ही न्याय कुणाकडे मागायचा हे मीडियामध्ये येताच आमदारांनी तातडीने कोतुळ रुग्णालयात बैठक बोलवली व कारवाईचे अश्वासन दिले.

अकोले (अहमदनगर) : कुमारी अन्यना विश्वास शिंदे हिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही आत्मदहन करू, अशी भूमिका आई- वडिलांनी घेतल्याने व आमदार वेळ देत नसल्याने आम्ही न्याय कुणाकडे मागायचा हे मीडियामध्ये येताच आमदारांनी तातडीने कोतुळ रुग्णालयात बैठक बोलवली व कारवाईचे अश्वासन दिले. तर माजी आमदार यांनी घटनेबद्दल दुः ख व्यक्त करीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना संपर्क करून चौकशीची मागणी केल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाला आहे. 
वैभव पिचड म्हणाले काल जी हृदय पिळवटून टाकणारी घटना तालुक्‍यासमोर आली त्याने खऱ्या अर्थाने आरोग्य व्यस्थेबाबत प्रश्न चिन्ह उभे केले आहे. पाच वर्षांच्या लेकराचा बळी या व्यवस्थेने घेतलाय. शिंदे परिवार एक महिन्यापासून याठिकाणी न्यायाची अपेक्षा करतोय. त्यांना न्याय मिळवून देणं हे प्रथम कर्तव्य मानून जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सखल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन व संपर्क केला आहे. 
लॉकडाऊन सुरू होत असताना कर्मचारी उपलब्धी तसेच सर्व औषधे व लसी याठिकाणी सर्व ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे केली होती. पण त्याचीही पूर्तता झाली नाही. म्हणून त्याचे परिणाम खऱ्या अर्थाने तालुक्‍यातील गोरगरीब जनतेला भोगावे लागतायेत. तालुक्‍यात पुन्हा अशी घटना घडू नये तसेच आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून खऱ्या अर्थाने प्रशासनाला जाग आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलणार आहे. अनन्याचा प्राण वाचविणे नक्कीच शक्‍य होतं पण ते होऊ शकलं नाही आता तिला न्याय देऊन खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करणं आवश्‍यक आहे व त्यासाठी प्रयत्नशील आहे. 
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी शिंदे कुटुंबीयांची कोतुळ येथिल रूग्णालयात जाऊन भेट घेतली. अन्यन्या शिंदे या मुलीचा एक महिन्यापूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. माञ स्थानिक शासकिय कोतुळ रुग्णालयाकडुन चुकीचे उपचार करण्यात आल्याचा आरोप सदर कुटुंबाकडून केला गेला आहे. सर्पदंश झालेला असताना तीच्यावर कोरोनाचे पेशंट म्हणुन उपचार झाल्याचा कुटुंबियांचा आरोप असुन ज्या दिवशी मुलगी मयत झाली. अगदी त्याच दिवशी सदर मुलीचा मृत्यु हा नेमका कशामुळे झाला हे सष्ट करण्यात यावे, साठी स्वतः प्रशासनाशी बोललो होता. अन्यन्याचा मुर्त्यु होणे हे अतिशय क्‍लेशकारक आहे. आई- वडिलाचा राग अनावर होणे स्वाभिविक व नौसर्गीक गोष्ट मी मानतो. कारण एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्यावर रागावणे मी गैर समजत नाही. माञ अशी घटना परत अकोले तालुक्‍यात होऊ नये, यासाठी तालुक्‍याती शासकिय रुग्णालयातील मुख्य अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन त्याना सूचित केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akole MLA assure that Shinde will bring justice to the family