अकोले तालुका भारतीय जनता पक्षाची कार्यकारीणी जाहीर

शांताराम काळे 
Sunday, 6 December 2020

यावेळी माजी आ. वैभवराव पिचड म्हणाले की, भाजपची नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी ही सर्व सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवतील.

अकोले (अहमदनगर ) : अकोले तालुका भारतीय जनता पक्षाची आज कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष, 9 उपाध्यक्ष, 3 सरचिटणीस, 11 चिटणीस, कार्यालय प्रमुख, प्रसिध्दी प्रमुख, कायम निमंत्रित व निमंत्रित सदस्य तसेच विविध आघाडीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या निवडी घोषित करण्यात आली.

माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे व जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्या कोअर कमिटीने ही निवड केली असून या पदाधिकारी निवडीची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी दिली. यावेळी माजी आ. वैभवराव पिचड, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, राहुल देशमुख, हितेश कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आ. वैभवराव पिचड म्हणाले की, भाजपची नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी ही सर्व सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवतील. कोरोना व इतर सर्व बाबींचा विचार करण्यास वेळ लागला म्हणून ही कार्यकारिणीची निवड करण्यास उशीर झाला आहे. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुकीत सर्व एकदिलाने काम करणार असून भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. अजून आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, तसा कोणी संपर्क साधल्यास त्यावर नंतर निर्णय घेण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारची ही दुसरी टर्म असून त्यांनी शेतकर्‍यांच्या व सर्व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहे. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने तालुक्यासाठी काहीही मदत केली नाही. ग्रामपंचायतीचा विकास कामांचा निधी राज्य शासनाने परत घेतले. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी या कामी पुढाकार घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता त्यामध्ये राजकारण आणून खोडा घातला.

नगरपंचायतीने कोरोनाच्या काळात अतिशय चांगले काम केले, तर अगस्ति कारखान्याने कोव्हीड सेंटर उभारून औषधेही उपलब्ध करून दिली. मात्र लोकप्रतिनिधी व शासन तालुक्यासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी कमी पडले आहे. तालुक्यातील सर्व संस्था ह्या चांगले काम करीत असून या पुढेही अतिशय जोमाने काम सुरु राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

रविवार (दि.6 डिसेंबर) रोजी पंडित दीनदयाळ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली. यावेळी स्वागत व प्रास्ताविक जालिंदर वाकचौरे यांनी केले तर आभार गिरजाजी जाधव यांनी मानले.

कायम निमंत्रित- माजी मंत्री मधुकरराव पिचड, मा.आ. वैभवराव पिचड, सिताराम गायकर, जालिंदर वाकचौरे, निमंत्रित सदस्य-विठ्ठलराव चासकर, शिवाजी धुमाळ, वसंतराव मनकर, दत्तात्रय देशमुख, जयराम आंबरे, परबत नाईकवाडी, के. डी. धुमाळ, रावसाहेब वाकचौरे, सदस्य कैलास तळेकर, मुरलिधर भांगरे, रामनाथ भांगरे, गुलाब खरात, भाऊसाहेब कासार, अशोक आवारी.

तालुका अध्यक्ष- सिताराम भांगरे, उपाध्यक्ष- सुभाष वाकचौरे, गणेश पोखरकर, सुभाष बेणके, बाबासाहेब आभाळे, सविता दिपक वरे, काशिनाथ साबळे, बाबासाहेब उगले, तुकाराम खाडे, पांडुरंग कचरे, सरचिटणीस - भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, यशवंत आभाळे, मच्छिंद्र मंडलिक, चिटणीस-विद्या दिपक परशरामे, चक्रधर सदगिर, माधव ठुबे, चंद्रकला धुमाळ, काळु भांगरे, राजु पिचड, महादु बिन्नर, संतोष देशमुख, सयाजी अस्वले, मारूती बांडे, रेश्मा गोडसे, कार्यालय प्रमुख- कविराज भांगरे, सहप्रमुख दादाभाऊ मंडलिक, प्रसिध्दीप्रमुख राकेश कुंभकर्ण, सदस्य कामिनी पवार, रेखा नवले, माधवी जगधने, सिताबाई गोंदके, सारिका वाडाळे, कल्पना वैद्य, संगिता लहामगे, संगीता गोडसे, भिमाबाई खरात, शालनताई पोखरकर, सुरेखा देशमुख, सोनाली सावंत, वैशाली बोडके, वैशाली बोडके, अलका अवसकर, उर्मिला  राऊत.

युवा मोर्चा अध्यक्ष राहुल देशमुख, सरचिटणीस सुशांत वाकचौरे, उपाध्यक्ष अमोल कोटकर, मदन आंबरे, प्रविण सहाणे, महिला तालुकाध्यक्षा शारदा गायकर, सरचिटणीस डॉ. वैशाली जाधव, अकोले शहराध्यक्ष सचिन शेटे, सरचिटणीस हितेश कुंभार, मच्छिंद्र चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित रासने, सरचिटणीस दत्ता ताजणे, कपिल समुद्र, शुभम खर्डे, दलित आघाडी अध्यक्ष बाळासाहेब साबळे, अल्पसंख्यांक आघाडी नाझीम शेख, किसान मोर्चा अविनाश तळेकर, सरचिटणीस मच्छिंद्र पानसरे, ज्ञानेश पुंडे, उपाध्यक्ष गणेश हासे, ओबीसी मोर्चा तान्हाजी झोडगे, सरचिटणीस शिवाजी पारासुर, श्रीकांत भुजबळ, सोशल मिडीया सेल महेश काळे, एन.टी. सेल भास्कर  येलमामे, जेष्ठ नागरीक सेल ज्ञानेश्‍वर बोडके, दिव्यांग सेल बाळासाहेब धुमाळ, सहसंयोजक संतोष वाकचौरे, सहकार सेल सोमनाथ मेंगाळ, ट्रान्सपोर्ट सेल अनिल सावंत, कामगार सेल प्रभाकर वाकचौरे, सांस्कृतिक सेल शरद नवले, अदिवासी सेल सुरेश भांगरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akole taluka Bharatiya Janata Party was declared the executive