काही सुखद : आदिवासी भागात राहून डॉ.भांडकुळी दाम्पत्यांनी बांधली समाजसेवेची खूणगाठ

In Akole taluka Dr. Maruti Bhandakuli and Dr. Jyoti Bhand Kulli is serving both the corona patients.jpg
In Akole taluka Dr. Maruti Bhandakuli and Dr. Jyoti Bhand Kulli is serving both the corona patients.jpg

अकोले (नगर) : अकोले तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम आरोग्याचा प्रश्न येथे पाचवीलाच पुजलेला आहे. आजारी पडले तर झाड पाला नाही तर भगत, गंडे दोरे वापरले जाते. आजही आपण २१ व्या शतकाकडे जात असताना हा प्रकार येथे पाहायला मिळतो. ठिकठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्र सुरु असले तरी फारच मोठा आजार झाला तर आपण दवाखाना पाहायला जातो, मात्र आदिवासी समाजात जन्मलेले डॉ. मारुती भांडकुळी यांनी हे चित्र लहानपणापासूनच पाहिलेले असल्याने आपण डॉक्टर होऊन आदिवासी समाजाची तालुक्यात राहून सेवा करायची ही  बांधली व जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले एम डी मेडिसिन फेलोशिप इन क्रेटीकल करीयर मेडिसन शिक्षण पूर्ण केले. 

आज ते अकोलेसारख्या आदिवासी भागात त्यांची पत्नी डॉ. ज्योती भांड कुळी (डी एच एम एस ) हे दोघे रात्र दिवस कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. त्यांनी शहरात रुग्णालय टाकले असते तर लक्ष्मी प्राप्तीचा मोठा योग आला असता. मात्र आदिवासींची आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. शिक्षण घेत असताना केळीकोतूळ आश्रमशाळा, ते संगमनेर मालपाणी कॉलेज प्रवास करताना त्यांनी शिक्षण घेतले. रात्रीची साखर कारखान्यात पोते उचलण्याची नोकरी करून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना वकील प्रदीप मालपाणी देवदूत म्हणून भेटले नि त्यांचा डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
     
परमेश्वराचीही इच्छा असते कोणी कधी यावे. त्यानुसार परमेश्वरानी अकोले करांची पुन्हा सेवा करण्यासाठी डॅा.भांडकोळी यांना संधी दिली असून कोरोनाच्या संकटकाळात अकोलेकरांसाठी कोविड सेंटर व हॅास्पिटलचा शुभारंभ हा योगायोग आहे. डॅाक्टरांवर अकोलेकरांचेही प्रेम असल्याने आज सर्व पक्षीय नेत्यासह पदाधिकारीही एकञ आले हेच त्यांचे खरे भांडवल आहे. अकोले तालुक्यात वाढती कोरोनाच्या रुग्णसंख्या अनुषंगाने उपचारासाठी तालुक्यात सुसज्ज असे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी डॅा.श्री व सौ. भांडकोळी यांच्या संकल्पनेने सामाजिक संघटना व  प्रशासन यांच्या सहकार्याने हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिस्ट हॅास्पिटल येथे कोविड सेंटरचा शुभारंभ नुकताच राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, माजी मंञी मधुकरराव पिचड यांचे हस्ते करण्यात आला. 

यावेळी विद्यमान आमदार डॅा.किरण लहामटे, माजी आ.वैभवराव पिचड, एस.एम.बी.टी.रुग्णालयाचे डिन डॅा. हर्षल तांबे, डॅा.मारूती भांडकोळी, साै.भांडकोळी, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॅा.इंद्रजित गंभिरे, डॅा संजय घोगरे, डॅा.बाळासाहेब मेहञे आदी उपस्थित होते.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट कोरोनाचे संकट आहे. कोरोनाने देशाची अर्थव्यवस्था ढासाळली आहे. गरीब बरोबरच मध्यमवर्गीयही अडचणीत आला आहे. त्यामुळे अनेकांचे उत्पन्न थांबलेले आहे. अशा संकटकाळात सर्वांना मदत करणे गरजेचे आहे. उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्यादृष्टीने आज अकोले तालुक्यासाठी हे कोविड सेंटर लाभदायी ठरले.

एका आदिवासी गावातील आदिवासी कुटुंबातील हुशार व्यक्तिमत्व असलेले डॅा.भांडकोळी एक शार्प व्यक्तिमत्व आहे. २००८ ला पहिले रुग्णालय सुरु करुन यशस्वी वाटचाल करत जवळपास १० हजार व्यक्तींना जीवदान देणारे देवदूत असून सर्पदंशावर तालुक्यात स्पेशालिस्ट म्हणून नावलौकिक आहे. एम.डी.मेडीसीन होऊन मोठ्या शहरात ते व्यवसाय करु शकत होते. माञ आपले लोक ज्या तालुक्यात राहतात, आपल्या लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्याच तालुक्यात थांबून वैद्यकीय सेवा सुरु केली आहे. सोबत त्यांची पत्नी त्यांना साथ देत आहे. यापूर्वी त्यांनी ससून रुग्णालय, जहांगीर रुग्णालय पुणे, कीइएम मुंबई येथे सेवा केली.

अकोले येथे मित्रांच्या मदतीने सुसज्ज असे रुग्णालय बांधले असून स्वतःचे ३५ बेड व सरकारी २५ बेड असे कोरोना प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना ते सेवा देत आहे. आतापर्यंत २०० रुग्णांना त्यांनी कोरोना मुक्त केले असून सध्या १५ रुग्ण त्यांच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी गरीब रुग्णांना संगमनेर नाशिक येथे जाणे परवडत नाही, त्यांची इथेच सोय करा असे सांगताच स्वत:च्या रुग्णालयात २५ बेड ऑक्सिजनसह देऊन त्यांनी कोरोना बाधित रुग्णांना मदत केली.

मात्र अलीकडे रुग्णांची संख्या कमी झाल्याने त्यांनी सर्व रुग्णांना आपल्या रुग्णालयात येण्याचे आव्हान केले. आपल्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना ते सेवा देतात. त्यांची पत्नी डॉ. सौ ज्योती भांडकुळी या २४ तास कोव्हीड केंद्र सांभाळतात. त्यांची दोन मुले त्यांचे सासू सासरे सांभाळतात. हे दोघे दाम्पत्य रुग्णालयातच जेवण व विश्रांती घेतात. आलेल्या रुग्णांना अतिथी देवो भव ही वागणूक त्यांच्याकडून मिळते. शिवाय त्यांच्यासोबत २४ कर्मचारी कोव्हीड केंद्रात तर २५ कर्मचारी इतर आजारासाठी कार्यरत आहेत.

राजीव गांधीआरोग्य योजना, केंद्र सरकारची आरोग्य योजना ते राबवत असून गरीब उपेक्षित रुग्णांना अल्प दारात ते सेवा देतात. मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुविधा त्यांना उपलब्ध करावयाची असून त्यांचे त्या दृष्टीने पावले पडत आहे . खांद्याला खांदा देऊन डॉ. ज्योती त्यांना साथ देत असल्याने अल्पावधीतच डॉ. मारुती व डॉ. ज्योती भांडकुळी यांचे नाव परिसरात परिचित झाले आहे . कोरोनाच्या महामारीत २४ तास सेवा देणारे हे दाम्पत्य खऱ्या अर्थाने कोव्हीड योध्ये आहेत. 
   
माजी मंञी पिचड म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात सर्वांनी एकञ येवून लढा दिला पाहिजे. सध्या वाढत्या कोरोनाचे प्रादुर्भाव काळात ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी अपेक्षा व्यक्त करुन डॅा.भांडकोळी यांचे काम तालुक्यात चांगले असून ते माझेही फॅमिली डॅाक्टर आहे. त्याच्यामुळे माझे उपचारासाठी मुंबईला जाणे बंद झाले आहे.

आज त्यांचे सरु झालेल्या कोविड सेंटरचा तालुक्यातील लोकांना निश्चितच फायदा होईल. तालुक्यातील विविध संस्थांनीही यात योगदान दिले आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याने राजकारण बाजूला ठेवून तालुक्यातील लोकांच्या हितासाठी कोविड सेंटर सुरु केले आहे. शासनाचे खानापूर कोविड सेंटर सुरु आहे. आज डॅा. भांडकोळी यांचे कोविड सेंटर सुरु होत आहे. यातही शासन स्तरावर २५ बेड ही मोफत उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. या कोविड सेंटरमुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांवर तालुक्यातच उपचार होणार असून सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, एका आदिवासी गावातील आदिवासी कुटुंबातील हुशार व्यक्तिमत्व असलेले डॅा.भांडकोळी एक शार्प व्यक्तीमत्व आहे. २००८ ला त्यांनी पहिले रुग्णालय सुरु करुन यशस्वी वाटचाल करत जवळपास एक हजार व्यक्तीना जीवदान देणारे देवदूत असून सर्पदंशावर तालुक्यात स्पेशालिस्ट म्हणून नावलौकिक आहे. एम.डी.मेडीसीन होऊन मोठ्या शहरात ते त्यांचे कार्य करु शकत होते. माञ आपले लोक ज्या तालुक्यात राहतात. आपल्या लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने आपल्याच तालुक्यात थांबून वैद्यकीय सेवा सुरु केली आहे.

माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, आज डॅा. भांडकोळी यांचे कोविड सेंटर सुरु होत आहे. यातही शासन स्तरावर २५ बेड ही मोफत उपचारासाठी ठेवण्यात आली आहे. या कोविड सेंटरमुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांवर तालुक्यातच उपचार होणार असून सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com