ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त करा; दारूबंदी आंदोलनाचे आवाहन

शांताराम काळे 
Thursday, 7 January 2021

निवडणुका आठवड्यात संपून जातील पण व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील, हे व्यसनी तरुण तुमच्या माझ्या घरातीलच असणार आहेत. आज फुकट दारू पिणाऱ्यांना उद्या स्वखर्चाने दारू प्यावी लागणार आहे.

अकोले (अहमदनगर) : लग्नातील वराती आणि निवडणुका हे तरुण मुलांना आयुष्यात प्रथम दारू पाजण्याचे प्रशिक्षण केंद्र झाल्याने आपल्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका दारूमुक्त होतील. यासाठी गावातील जाणत्या माणसांनी, महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दारूबंदी आंदोलनाने केले आहे. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

निवडणुका आठवड्यात संपून जातील पण व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील, हे व्यसनी तरुण तुमच्या माझ्या घरातीलच असणार आहेत. आज फुकट दारू पिणाऱ्यांना उद्या स्वखर्चाने दारू प्यावी लागणार आहे. याचे भान ठेवून त्यामुळे दोन्हीही पॅनलने व गावातील जाणत्या लोकांनी गांभीर्य ठेवून दारू वाटणाऱ्या, मुलांना हॉटेलमध्ये नेणाऱ्या उमेदवारांना समज द्यावी व गावातील मतदारांनी असे उमेदवार पराभूत करावेत असेही आवाहन केले आहे. अशा उमेदवारांच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कराव्यात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनीही दारू वाहतूक, वेळ संपल्यावर रात्री हॉटेल उघडी राहणे व अवैध दारूची विक्री याबाबत लक्ष ठेवावे व कारवाई करावी याबाबत आंदोलनाच्या वतीने पत्र दिले जाणार आहे. तेव्हा दारूमुक्त निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आंदोलनाचे कार्यकर्ते अशोक सब्बन, हेरंबकुलकर्णी, रंजना गवांदे, भाऊसाहेब येवले, संतोष मुतडक,अमोल घोलप, कारभारी गरड, बाळासाहेब मालुजकर, संदीप दराडे, मारुती शेळके, जालिंदर बोडके यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The alcohol ban movement has appealed to make the gram panchayat elections alcohol free