भाजपा महाराष्ट्रला हिंदीचं कौतिक; ‘त्यांचे’ ट्विटर अकाऊंट तर बघा

All posts on Twitter from Maharashtra BJP on the occasion of Hindi Day in Hindi
All posts on Twitter from Maharashtra BJP on the occasion of Hindi Day in Hindi

अहमदनगर : देशात सध्या प्रादेशिक आस्मितेचा वाद सुरु आहे. भाषेवरुनही राजकारण व समाजकारण डवळून निघाले आहे. अभिनेता सुशातसिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरण व कंगना राणावत प्रकरणाने या वादाला फोडनी मिळाली आहे. देशात सध्या हाच चर्चेचा मुद्दा आहे. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला टार्गेट केले आहे. 

मराठी आस्मिता बिहारच्या पायावर वाहिल्याचाही आरोप होत आहे. या हिंदी मराठी वादात आज आणखीच भर पडण्याची शक्यता आहे. भाजपा महाराष्ट्रने आजचा दिवस हिंदीला समर्पीत केला आहे. त्यांच्या भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरुन बहुतांश पोस्ट हिंदीत केल्या आहेत. यात चंद्रकात पाटील यांची पोस्ट मराठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदीच्या हिंदीला शुभेच्छा दिलेल्या पोस्टही या पेजवर रिट्विट केल्या आहेत.

देशात 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी ही जगात बोलल्या जाणार्‍या प्रमुख भाषांपैकी एक आहे. हिंदी ही 'राष्ट्रीय भाषा' आहे. हिंदीने एक नवी ओळख निर्माण केली आहे. हिंदी दिनानिमीत्त विविध कार्यक्रम घेतले जातात. याचाच भाग म्हणून की काय, महाराष्ट्र भाजपच्या ट्विटरच्या अकांऊंटवर आज एकही मराठी पोस्ट केलेली दिसत नाही. जणू सर्व पोस्ट हिंदीत करुन मनवंदनाच दिली आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर संविधान सभेने एकमताने निर्णय घेतला की हिंदीची स्थायी बोली ही भारताची अधिकृत भाषा असेल. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे महत्त्व सांगण्यासाठी व प्रत्येक भागात हिंदीचा प्रसार करण्यासाठी 'हिंदी दिन' साजरा केला जातो. पुढे हळूहळू हिंदीची भाषा वाढत गेली. त्या भाषेने राष्ट्रीय भाषेचे रूप धारण केले. राष्ट्रीय भाषा ही कोणत्याही देशाची ओळख आणि अभिमान असते. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर अकाऊंटवर आज सर्व ट्विट हिंदीत आहेत. 

हिंदी भाषेबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, हिन्दी दिवस पर आप सभी को बहुत-बहुत शुभकामनाएं। इस अवसर पर हिन्दी के विकास में योगदान दे रहे सभी भाषाविदों को मेरा हार्दिक अभिनंदन। 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय की, आज हिंदी दिवस के अवसर पर मैं इसके सशक्तिकरण में योगदान देने वाले सभी महानुभावों को नमन करता हूँ और देशवासियों से यह आवाहन भी करता हूँ कि अपनी मातृभाषा के साथ-साथ हिंदी का अधिक से अधिक प्रयोग कर उनके संरक्षण व संवर्धन में अपना योगदान देने का संकल्प लें।
हिंदी दिवस की शुभकामनाएं। हिंदी भारतीय संस्कृति का अटूट अंग है। स्वतंत्रता संग्राम के समय से यह राष्ट्रीय एकता और अस्मिता का प्रभावी व शक्तिशाली माध्यम रही है। हिंदी की सबसे बड़ी शक्ति इसकी वैज्ञानिकता, मौलिकता और सरलता है। मोदी सरकार की नयी शिक्षा नीति से हिंदी व अन्य भारतीय भाषाओं का समांतर विकास होगा।

माजी मंत्री सुधीर मुंनगुटीवार यांनी म्हटलं आहे की, केवल शब्दों से नहीं भावना ओं बनी ये भाषा है. हर भारतवासी के जीवन की परिभाषा है. हिंदी भाषा दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com