नगरमध्ये ऊसगाळपात "अंबालिका"ची आघाडी, "नागवडे"चा जास्त

दौलत झावरे
Thursday, 17 December 2020

जिल्ह्यात सहकारी व खासगी एकूण 23 कारखाने आहेत. त्यातील साईकृपा-दोन व तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे.

नगर ः जिल्ह्यात सध्या 13 सहकारी व आठ खासगी साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहेत. त्यात आजअखेर सर्व कारखान्यांचे 43 लाख 19 हजार 925 टन उसाचे गाळप झाले असून, त्यात अंबालिका कारखान्याने आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यात नागवडे कारखाना जिल्ह्यात अव्वल आहे. 

जिल्ह्यात सहकारी व खासगी एकूण 23 कारखाने आहेत. त्यातील साईकृपा-दोन व तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे. जिल्ह्यातील 13 सहकारी कारखान्यांनी 28 लाख 44 हजार 965, तर 8 खासगी कारखान्यांनी 14 लाख 74 हजार 960 मेट्रिक टन, असे एकूण 43 लाख 19 हजार 925 टन उसाचे गाळप केले आहे.

हेही वाचा - पवार-शिंदे संघर्ष ग्रामपंचायतीमुळे पुन्हा पेटणार

आजअखेर एकूण 36 लाख 52 हजार 580 क्विंटल साखर तयार झाली आहे. त्यात अंबालिका कारखान्याने पाच लाख 39 हजार 420 टन गाळप केले असून, 4 लाख 76 हजार 250 क्‍विंटल साखर तयार करीत जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल ज्ञानेश्‍वर कारखान्याने 3 लाख 96 हजार 940 टन उसाचे गाळप करून 3 लाख 58 हजार 700 क्विंटल साखर तयार केली आहे.

तिसऱ्या स्थानी भाऊसाहेब थोरात कारखाना असून, त्यांनी तीन लाख 82 हजार 140 टन उसाचे गाळप करून, तीन लाख 33 हजार 990 क्विंटल साखर केली आहे. 

साखर उताऱ्यात "नागवडे'ची आघाडी 
अंबालिका कारखान्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असली, तरी साखर उताऱ्यात नागवडे कारखाना आघाडीवर आहे. नागवडे कारखान्याचा साखर उतारा 10.05 आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर साईकृपा-एक असून, साखर उतारा 9.56 आहे. तिसऱ्या स्थानी कुकडी साखर कारखाना (9.19) आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Ambalika" leads in sugarcane cultivation in the city, more than "Nagwade"