मुळा धरणाच्या कालव्यात बुडून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
Keshav Kale
Keshav KaleImages By Whats up

राहुरी (अहमदनगर) : काळे आखाडा येथे शनिवारी दुपारी दोन वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात एक वृद्ध व्यक्ती पडले. कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून पाच किमी अंतरावर आखाडा येथे रात्री साडेआठ वाजता मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

केशव मंजाहरी काळे (वय ७५, रा. काळे आखाडा, राहुरी) असे मृताचे नाव आहे. त्यांची वस्ती कालव्याच्या कडेला आहे. त्यांना दृष्टीदोष होता. दुपारी घरातून बाहेर पडल्यावर ते नाहीसे झाले होते. दुपारी दोन वाजल्यापासून त्यांचे नातेवाईक शोध घेत होते.

गुरुवारी (ता. १५) सकाळी सहा वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले. शनिवारी (सकाळी) कालव्यातून अडीचशे क्यूसेकने पाणी सुरु होते. काळे पाय घसरून कालव्यात पडल्याच्या संशय नातेवाईकांना होता. अखेर संशय खरा ठरला. रात्री साडेआठ वाजता त्यांचा मृतदेह येवले आखाडा येथे पाण्यातून बाहेर काढण्यात आला. काळे यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. गजानन काळे यांचे ते वडील होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com