अंगणवाडीताईची मुलगी झाली डीवायएसपी

khetmalis
khetmalis

श्रीगोंदे : यंदाच्या एपीएससी परीक्षेचे वैशिष्ट्य काय असेल तर गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची मुलं अधिकारी झाली. तहसीलदारपदापासून उपजिल्हाधिकारीपदापर्यंतची पदे त्यांनी काबीज केली आहेत. श्रीगोंद्यातील शेतकऱ्याच्या लेकीनेही तेच केलं.

एमपीएसीचा रिझल्ट आला आणि ती डीवायएसपी झाली. सगळ्या कुटुंबाला आनंद होणे स्वाभाविक होते. मात्र तिचे स्वप्न अजून अधुरे राहिल्याचे तिच्या डोळ्यात दिसत आहे. डीवायएसपी हे ध्येय नव्हतेच तिला व्हायचे आहे आयपीएस अथवा आयएस अधिकारी आणि त्यासाठी ती जीवाचे रान करून अभ्यास करीत आहे. श्रीगोंदयातील शेतकऱ्याची पोर प्रतीक्षा नामदेव खेतमाळीसच्या  जिद्दीची कहाणी आहे ही.

चार दिवसांपूर्वी एमपीएससी परीक्षेचे निकाल लागले. श्रीगोंदयातील पोरांनी चांगली बाजी मारली मात्र लक्ष वेधून घेतले. ते प्रतीक्षा खेतमाळीस हिने. त्याला कारण तसेच आहे. तीचे वडील नामदेव खेतमाळीस हे हाडाचे शेतकरी असले तरी त्यांचेही शिक्षण बीए बीएडपर्यंत झाले आहे. काही काळ एका खाजगी शिक्षण संस्थेत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. प्रतीक्षा हिची आई मीराबाई या अंगणवाडीशी निगडित आहेत. 

प्रतीक्षा हिची मोठी बहीण कम्प्युटर इंजिनिअर झाली असून तिचा धाकटा भाऊ एमपीएससीची तयारी करतोय. नामदेव व मीराबाई या दांपत्यांनी त्यांच्या मुलांवर संस्कार करतानाच उच्च शिक्षण देण्यासाठी कष्ट घेतले.
प्रतीक्षा सांगत होती, एमपीएससी परीक्षेची नव्हे तर ती यूपीएससीची तयारी करीत आहे. मी एमपीएससी परीक्षेत खास लक्ष दिले नव्हते  खरे ध्येय आहे आयपीएस किंवा आयएस होण्याचे. त्यासाठी मी मेहनत घेत आहे.

आई वडील बहीण यांनी मला नुसते मार्गदर्शन केले नाही तर काहीही कमी पडू दिले नाही. माझ्यासाठी देव हेच आहेत. त्यांच्यामुळे मी हे यश मिळविले व पुढच्या ध्येयाची तयारी करीत आहे. माझे टार्गेट ठरविले आहे आणि त्यासाठी लागणारी जिद्द माझ्याकडे आहे.

अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com